Menubar

अभिनंदन!! अभिनंदन !! अभिनंदन!! ✌🌹🥇🥇🥇🏆🏆 ⚜ रयत शिक्षण संस्थेचे, ⚜ न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल. ⚜ 💐💐💐💐💐💐💐💐 NMMS परीक्षा निकाल 2024 ✌💐💐🏆🥇🥇💐💐 !!! या वर्षी उत्तुंग यश !!! 💫 एकूण परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी - 47💫 ⭐ परीक्षेत पात्र विद्यार्थी - 30 💫 NMMS शिष्यवृत्ती धारक 2-विद्यार्थी 🏆सारथी शिष्यवृत्ती धारक - 16 विद्यार्थी 🥇🥇🥇2 विद्यार्थ्यांना 60,000 रुपये प्रमाणे 1,20,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार🥇🥇🥇 🏆सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी - 16 प्रति विद्यार्थी 38,400 रुपये प्रमाणे 6,14,400/रुपये शिष्यवृत्ती मिळणार.🏆👍👍👍 🥇🥇🏆🏆 एकूण 7,34,400/रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार🏆🏆🥇🥇 NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी ⭐ पाटकर रोहन अंकुश ⭐ कांबळे रोहन शंकर सारथी शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी - 16 ⭐ सरवळे प्रसन्न प्रशांत ⭐कु. जाधव प्रणाली काकासाहेब ⭐ कु.गायकवाड प्रशाली केराप्पा ⭐ पवार यश विजय ⭐ साळुंके सूर्यन संजयकुमार ⭐ जाधव समर्थ रामचंद्र ⭐क्षीरसागर शंभुराजे अविनाश ⭐ अवताडे प्रज्वल संभाजी ⭐ कु. घोडके समृद्धी हरिश्चंद्र ⭐ कु.जाधव जुई संजय ⭐ताड आदर्श बाळू ⭐ निकम प्रणव परमेश्वर ⭐ घोडके सुमित नितीन ⭐जाधव ओम संतोष ⭐ झिंजुर्डे मंथन मोहन ⭐ कु.साळुंखे संस्कृती समाधान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐 विभाग प्रमुख - श्रीमती. सुर्वे पी ए. सौ. माने एस. एम., श्री. खाडे व्ही. एन, श्री. बिराजदार ए. ए., श्री. बोईनवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक मा. श्री. मदने जे. पी., गुरुकुल विभाग प्रमुख श्री. खरात एन आर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल कुरूल स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती कुरूल पंचक्रोशीतील सर्व पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले 🏆🏆🥇🥇🥇🏆🥇🥇🥇🥇✌✌💐

School


रयत शिक्षण संस्थेचे,

न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल ता. मोहोळ जि. सोलापूर

-: शाखा इतिहास :-


१)       स्थापना वर्ष -१९६७

२)       स्थापना पूर्व स्थिती
          कुरुल हे गाव मोहोळ तालुक्यातील लोकसंख्येने दोन नंबरचे गाव असूनही येथे माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. मुले शिक्षणासाठी मोहोळ व सोलापूर येथे जात होती. गावात माध्यमिक शिक्षण घेणाऱ्यांची संख्या नगण्य होती. वाहतूक सोय नव्हती. अशा या गावात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पासून प्रेरणा घेऊन गावातील प्रतिष्ठित कै. मारुती आनंदराव पाटील उर्फ आबा व कै. महालिंग गुरुलिंग आंबरे, कै. विठ्ठल गेनू बाळसराफ यांनी स्थानिक कमिटी स्थापन करून रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. गावामध्ये इमारत नसताना सरकारी शाळा इमारत, गावातील वाडे, चावडीवर शाळा भरविण्यास सुरवात केली.
कै. बाबुराव आप्पाराव बोंगे, कै. नामदेव आप्पाराव बोंगे व श्री. विश्वनाथ आप्पाराव बोंगे यांनी प्रत्येकी 2  एकर जमीन देऊन संस्थेच्या जागेचा प्रश्न सोडविला व स्थानिक स्कूल कमिटीने कै. आबा यांचे  मार्गदर्शनाखाली विविध स्तरातून देणग्या जमा करून मिळालेल्या जागेवर ८ खोल्यांचे इमारत बांधकाम सुरु केले. कै आबा यांनी इमारत बांधकामासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंक, तहसील कार्यलय, ग्रामसेवक यांच्यामार्फत गावातील सर्व जनतेकडून देणग्या गोळा करून ८ खोल्याच्या इमारतीचे सुमारे ११ लाखाचे काम सुरु केले. सदर बांधकामाची देखरेख कै. प्रभू भिमू कदम, कै. महालिंग आंबरे, कै. विठ्ठल बाळसराफ यांनी केले. सदरचे बांधकाम पूर्ण करून सन १९९२ साली संस्थेकडे वर्ग केले.
३)      शाखा विकासात स्थानिक मान्यवरांचे योगदान
सुरुवातीस कै. महालिंग गुरुलिंग आंबरे, कै. प्रभू भिमू कदम, कै. विठ्ठल गेनू बाळसराफ व कै. मारुती (आबा )पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय सुरु करण्यासाठी सहकार्य करून सन १९६४ पासून न्यू इंग्लिश स्कुल ची सुरुवात केली  कै. बाबुराव आप्पाराव बोंगे यांनी प्रत्यकी २ एकर प्रमाणे एकूण ६ एकर जमीन देऊन शाखेची मुहूर्तमेढ रोवली. प्रगतशिल बागायतदार प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते कै.मारुती (आबा) पाटील यांनी त्यांचे सहकार्याच्या मदतीने देणगी रूपाने मिळालेल्या ६ एकर जागेमध्ये ८ खोल्याची दगडी इमारत उभी केली. कै. आबा यांनी मुख्यमंत्री निधीतून २ लाख रु. व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ११०००/-रु. ची देणगी मिळविली व मा. श्री. पवार साहेब यांचेकडून मुख्यमंत्री फंडातून८०,०००/-रु. व ५०,०००/-रु. अशी दोनवेळा मदत मिळवून इमारत पूर्ण केली.
कै. विलासचंद्र मोतीचंद मेहता यांनी परमेश्वर पिंपरी येथील २५ एकर जमीन १४/११/१९९१ रोजी कै. आबा यांचे प्रयत्नातून विद्यालयास बक्षीसपत्राने मिळवून दिली. सदर जमिनीवर मा. एन. डी. पाटील साहेब यांचे मार्गदर्शनानुसार रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामस्थांनच्या सहकार्यातून कै. आबांनी पडीक असणारी जमीन कै. महालिंग आंबरे यांचे देखरेखीखाली सपाटीकरण, विहीर, पाईपलाईन करून सुमारे १५ एकर जमीन बागायत केली. कै. आबांनी उजनी कॅनॉलमधून विद्यालयाच्या शेतीसाठी खास बाब म्हणून शासनाकडून कॅनॉलचे दार सुमारे ३.५० लाख खर्च करून शेतीसाठी घेतले.
                कै. मारुती (आबा) पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २५ खोल्यांची इमारत बांधकाम पूर्ण झाले. कै. महालिंग आंबरे, कै. प्रभू भिमू कदम व श्री. महादेव घोडके यांनी या स्कूल कमिटी सदस्यांनी त्यांच्या हयातीपर्यंत संस्थेच्या विकासाची कामे केली. कुरुल हनुमान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री. दगडू काशिनाथ लिगाडे यांनी सोसायटी दुकानातून रिकामा बारदाना विक्री करून येणारी रक्कम सुमारे ९०००० /- रु. संस्थेच्या बांधकामासाठी दिली.

४)      शाखेस लाभलेले मुख्याध्यापक, त्यांचे योगदान व त्यांनी केलेले बदल
अ.न      मुख्याध्यापक नाव                       कालावधी                            योगदान
 १)          श्री. सुतार ए.एन                    १९६७ ते १९७२                      शाखेची स्थापना केली
 २)          श्री. मेटे व्ही.बी.                     १९७२ ते १९७३                      शेक्षणिक गुणवत्ता वाढविली
 3)          श्री. डंके बी.बी.                     १९७३ ते १९८४                      प्रतिकूल परीस्थिती विविध ठिकाणी वर्ग चालवले
 ४)          श्री. किरगत एस. एन.             १९८४ ते १९८८                    शेक्षणिक गुणवत्ता वाढविली
 ५)          श्री. डंके बी.बी.                     १९८८ ते १९९०
 ६)          श्री. चंदनशिवे ए.एस.              १९९० ते १९९१
 ७)          श्री. शिंदे वाय.बी. १               १९९१ते १९९६                          गावातून शाळा नवीन इमारतीत भरविली
 ८)          श्री. माने जी.जे.                      १९९६ ते १९९९
 ९)          श्री. शिंदे एस.एल.                  १९९९ ते २००३
१०)        श्री. स्वामी जी.जी.                   २००३ ते ३०/४/१०
११)        श्री. जगदाळे एस.एस.              १/६/१० ते ३१/५/११             दुसऱ्या मजल्याचे बांधकाम पूर्ण केले
१२)        श्री. लोंढे पी.एस.                     १/६/११ ते ३०/६/१२
१३)        श्री. पवार ए.एन.                      १/७/१२ ते ३१/५/१४           गुरुकुल सुरवात केली व शेक्षणिक गुणवत्ता वाढविली
१४)        श्री. जगताप एस.एस.              १/६/१४ ते ३१/१२/१५
१५)        श्री. चव्हाण सी.डब्लू.              १/१/१६ ते ३०/६/१६
१६)        श्री. पिसे एस.के.                      १/७/१६ पासून

v  श्री. डंके बी. बी.              - इमारतीसाठी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न केले, इमारत बांधकामासाठी ग्रामस्थास प्रोत्साहित केले व ८ खोल्यांची दगडी बांधकाम सुरवात केली.

v  श्री. शिंदे वाय. बी.          - शाळेस देणगी रूपाने मिळालेल्या परमेश्वर पिंपरी येथील शेतजमिनीचा विकास केला. शेतजमिनीची मोजणी करून घेतली शाखेच्या जमिनीच्या भोवताली जंगली झाडाचे  कुंपण केले. इमारत बांधकाम करून वर्ग वाढवून गुणवत्ता वाढवली. विद्यालयामध्ये S.S.C. परीक्षा केंद्र सुरु केले.

v  श्री.माने जी.जे. - २ खोल्यांचे इमारत बांधकाम पूर्ण केले.

v  श्री. शिंदे एस. एल.-शेती विकास, वर्ग खोल्यांची वाढ व शैक्षणिक गुणवत्ता वाढविली. त्यांच्या कार्याचा विचार करून गुणवत्ता वाढविली. त्यांच्या कार्याचा विचार करून शाखेस २००२-०३ या शैक्षणिक वर्षात शाखेस कर्मवीर पारितोषिक मिळाले.

v  श्री. स्वामी जी. जी. - विद्यालयाच्या सभोवताली सुमारे २०० सागाची कलमी रोपे लागवड केली.दुसऱ्या मजल्याच्या ८ वर्ग खोल्याची सुरुवात केली. व स्लॅबच्या २ खोल्यांचे बांधकाम पूर्ण केले.

v  श्री. जगताप एस. एस.- डिजिटल क्लासरूम सुरुवात करून विद्यालयाची कमी होणारी विद्यार्थी संख्या वाढविली. गुरुकुल वर्गाचे चांगले नियोजन करून गुणवत्ता वाढविली व शाखेस आर्थिक मदत मिळविली.

v  श्री. पिसे एस. के. – यांनी संस्थेच्या शेतीवरील विहिरीचे दहा फुट फोडकाम करून ऊस लागवड वाढवून वेळोवेळी योग्य नियोजन करून शेतीचे उत्पन्न वाढविले. संस्थेच्या इमारत जागेच्या राहिलेल्या सपाटीकरणाचे काम पूर्ण केले. गुरुकुल वर्गाचे नियोजन चांगल्या प्रकारे करून सर्व क्षेत्रात प्रगती सुरु आहे.

५)      निकालाची परंपरा
सन
SSC शे. निकाल %
सन
SSC शे. निकाल %
सन
SSC शे. निकाल %
१९४७-७५
४८
१९८९ -९०
४२.८५
२००४-०५
९२.३०
१९७५-७६
७०
१९९०-९१
४३.४७
२००५-०६
९०
१९७६-७७
२०
१९९१ -९२
४२.५०
२००६-०७
९१.८१
१९७७-७८
४७.२२
१९९२-९३
६३.४१
२००७-०८
२८.०७
१९७८-७९
४३.३३
१९९३ -९४
८०.७०
२००८-०९
९७.१८
१९७९-८०
३४.७८
१९९४ -९५
९२.30
२००९-१०
७१.६३
१९८०-८१
५१.७२
१९९५- ९६
७४.६०
२०१०-११
७५.६३
१९८१-८२
७५
१९९६-९७
५२.९४
२०११-१२
९७.३४
१९८२-८३
७२
१९९७-९८
६३.३३
२०१२-१३
८६.६७
१९८३-८४
५१.४२
१९९८- १९९९
१००
२०१३-१४
९७.८
१९८४-८५
७५.३७
१९९९- २०००
१००
२०१४-15
१००
१९८५-८६
३१.३७
२०००-२००१
१००
२०१५-१६
९८.५२
१९८६-८७
३२.६०
२००१-२००२
७६.१३
२०१६-१७
९६.८८
१९८७-८८
२३.७२
२००२-२००३
९५


१९८८-८९
२१.५
२००३-२००४
९३.७५



६)      माजी विद्यार्थी संघ

अ.     क्र.
सदस्याचे नाव
पद
श्री. पाटकर जोतिर्लिंग गणपत
अध्यक्ष
श्री. बोंगे दत्तात्रय नामदेव
उपाध्यक्ष
श्री. पाटील विलास मारुती
उपाध्यक्ष
श्री. तांबोळी इम्रान सज्जन
उपाध्यक्ष
श्री. जाधव सचिन गहिनीनाथ
सचिव
श्री. जाधव चंद्रसेन मुरलीधर
सहसचिव
श्री. शिंदे मारुती तुकाराम
खजिनदार
श्री. पाटील तुकाराम दत्तात्रय
सदस्य
श्री. मोहोळकर प्रकाश नरसिंह
"
१०
श्री. बोंगे समाधान विश्वनाथ
"
११
श्री. श्री. पाटील प्रशांत प्रकाश
"
१२
श्री. पाटील दीपक तुकाराम
"
१३
श्री. पाटील विजय कृष्णदेव
"
१४
डॉ. श्री. पवार एन. बी. सर
"
१५
श्री. जाधव सिताराम पंडित
"
१६
श्री. कदम गिरिश दत्तात्रय
"
१७
श्री. लांडे रामचंद्र बलभीम
"
१८
कु. साठे कांचन अशोक
"




७)      विद्यार्थी संख्या – सुरुवातीची व सध्याची
ü  शाळा सुरु झाल्यानंतर सन १९६७-६८ मध्ये इयत्ता ८ वी मध्ये  ३७ मुले व ३ मुली मिळून एकूण ४० विद्यार्थी होते.
ü  सध्याची विद्यार्थी संख्या ५६१ मुले व ४४५ मुली एकूण १००६ एवढी विद्यार्थी संख्या आहे.

८)       शाखेसाठी मिळालेल्या देणग्या / देणगीदाराची यादी
१)     कै. बाबुराव आप्पाराव बोंगे, कै. नामदेव आप्पाराव बोंगे व श्री. विश्वनाथ आप्पाराव बोंगे यांनी प्रत्येकी २ एकर जमीन बक्षीस पत्राने संस्थेस दिली.
२)     कुरुल हनुमान सोसायटी यांचेकडून एकूण रु.९००००/-
३)     समस्त ग्रामस्त कुरुल यांचे कडून रु. ११००००/- दगडी इमारत बांधकाम रुपी
४)     कै. विलासचंद मोतीचंद मेहता यांनी परमेश्वर पिंपरी येथील २५ एकर जमीन बक्षीस रूपाने दिली.

९)       भौतिक सुविधा सुरुवातीची व सध्याची
ü सुरुवातीच्या काळामध्ये विद्यालयाच्या किंवा संस्थेच्या मालकीची भौतिक सुविधा उपलब्ध नव्हती. सन १९९२ पासून शाखेच्या जागेमध्ये शाळा आलेपासून सुमारे २५ खोल्यांचे बांधकाम पूर्ण केले.
ü मुलांसाठी भव्य ६ एकराचे मैदान, पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र बोअरवेल, पिण्याच्या पाण्याची टाकी, मुलांसाठी व मुलींसाठी  स्वतंत्र स्वच्छतागृह, ज्यु. कॉलेज स्वतंत्र दोन प्रयोगशाळा टेक्निकल विभाग, डिजिटल क्लासरूम, २ संगणक लॅब. इ. सुविधा उपलब्ध आहेत. व ज्यु. कॉलेज विज्ञान २ व कला २ वर्ग सुरु आहेत.

१०)  शाखेचा कालखंडानुसार विकास
ü  १९६७ ते १९९१ - शाखेच्या सुरुवातीचा काळ व इमारत जमीन बक्षीस पत्राने ६ एकर मिळाली.
ü  १९९१ ते २००० - नवीन इमारतीत विद्यालयाची सुरुवात झाली. ५ वी ते ८ वी तुकड्या वाढल्या व विध्यार्थी संख्या ही वाढली. गुणवत्ता ही वाढली. २५ एकर जमीन बक्षीस रूपाने मिळाली.
ü  २००१ ते २०१० - इमारतीचा दुसरा मजला पूर्ण झाला. विद्यालयास कर्मवीर पारितोषिक मिळाले.
ü  २०११ ते २०१७ – ज्यु. कॉलेजची स्थापना झाली. टेक्निकल विभाग सुरुवात झाली. गुरुकुल वर्ग सुरुवात झाली. सुमारे २५ लाखांचे डिजिटल क्लासरूम वर्ग सुरु झाले. २ संगणक लॅब सुरु झाले.

११)   शाखेने आजपर्यंत मिळविलेले यश व मिळवण्याचा ध्यास
१)  निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली.
२)  गुरुकुल वर्ग सक्षमपणे चालविले.
३)  शेतीचे उत्पन्न वाढवून त्या पैशातून इमारत बांधकाम केले.
४)  ज्यु. कॉलेज वर्ग सुरु केले.
५)  स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविले.

१२)  संस्थेच्या शासनाच्या विविध उपक्रमासाठी दिलेला सकारात्मक प्रतिसाद
१)       अनिवासी गुरुकुल प्रकल्प  सुरु आहे.
२)      लाही अंतर्गत तंत्रशिक्षण विभाग सुरु आहे.
३)      संस्थेच्या सर्व स्पर्धा परीक्षामध्ये सहभाग आहे.
४)      शासकीय स्पर्धा परीक्षामध्ये सहभाग आहे.
५)      SSC केंद्र सुरु आहे.
६)      कुरुल केंद्र अंतर्गत प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गासाठी मदत केली.
७)      केंद्र व बीट अंतर्गत क्रीडा स्पर्धेसाठी मैदान दिले.

१३)  विद्यार्थ्यासाठी राबविलेले नवोपक्रम
१)     अनिवासी गुरुकुल प्रकल्प
२)     प्रश्नमंजुषा स्पर्धा
३)     कर्मवीर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा
४)     शालेय वैज्ञानिक खेळणी व वैज्ञानिक प्रयोग व वस्तू स्पर्धा
५)     ग्रंथालयामार्फात निबंध स्पर्धा, जादा पुस्तक वाचन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन
६)     गुरुकुल अंतर्गत क्षेत्रभेट
७)     शैक्षणिक सहल  
८)     NTS, NMMS, RTS, MTS, चित्रकला, गांधी फौंडेशन, ५वी व ८वी  स्कॉलरशिप परीक्षा
९)     स्पर्धा परीक्षा तयारी
१०) विद्यार्थी वाढदिवस व पुस्तके भेट
११) गरजू विद्यार्थी फंड योजना

१४)  शाखेची आर्थिक स्थिती  पूर्वीची व सध्याची
ü  शाखेची पूर्वीची आर्थिक स्थिती सन १९६८-६९ एकूण - २४१७०/- एवढी होती.
ü  शाखेची सध्याची आर्थिक स्थिती सन २०१७-१८ एकूण - १४४८८३२९/- एवढी आहे.

१५)  शाखेचे समाजासाठी योगदान

१)   संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत ग्रामस्वच्छता
२)  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ज्यु. कॉलेज विद्यार्थ्यांनी श्रमदानातून ग्रामपंचायतीस शौचालयाचे शोष खड्डे पाडून दिले.
३)  प्रा. आ. केंद्र कुरुल यांचे मार्फत आयोजित साथीचे रोग विरोधी जनजागृती मोहीममध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग.
४)  कर्मवीर जयंतीदरम्यान विविध पथनाट्यातून जनजागृती
५)  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय नसलेल्या कुटुंबास शिक्षकाकडून शौचालय बांधून वापर करणेबाबत प्रबोधन

१६)   शाखेचा इतर शाखांची संबंध
ü  न्यू इंग्लिश स्कूल, सय्यद वरवडे व न्यू इंग्लिश स्कूल, कुसूर या शाखांना वेळोवेळी मार्गदर्शन व शहकार्य
ü  सोलापूर विज्ञान केंद्र, सोलापूर येथे गुरुकुल विद्यार्थी व भेट.
ü  डाळिंब संशोधन केंद्रास भेट.
ü  प्राथमिक शाळांना शिक्षकांनी मार्गदर्शन व भेट दिली.

१७)  शाळेला मिळालेले पुरस्कार व सन्मान
१)  आदर्श शाखाप्रमुख कर्मवीर पारितोषिक सन २००२-३००३
२)  दहावी बोर्ड परीक्षेत तालुक्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची प्रशाला प्रियदर्शनी पुरस्कार

१८)  विद्यार्थ्यांच्या विकासासाठी भविष्यातील नियोजन
१)  व्यायाम शाळा बांधणे  २) ५ खोल्यांची नवीन इमारत ज्यु. कॉलेज साठी बांधणे  ३) डिजिटल संकल्पना पूर्ण करणे  ४) फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिसबॉल इ. मैदाने तयार करणे.  ५)  बॉटनिकल गार्डन व गणित प्रयोगशाळा तयार करणे.  ६) ९ वी १० वी साठी V1 (तंत्रशिक्षण ) विभाग सुरु करणे.  ७) विद्यार्थ्यांच्या सायकलसाठी स्टँड करून घेणे.  ८) किचनशेड बांधणे. ९) पिण्याच्या पाण्यासाठी आरो बसवून घेणे.  १०) मैदानास दगडी भिंत कंपाउंड बांधणे.


१९)  उच्च पदस्थ माजी विद्यार्थी

अ. क्र
माजी विद्यार्थ्याचे नाव
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक कालावधी
पत्रव्यवहाराचा पत्ता
सध्या नोकरीचा हुद्दा
नोकारीचा पत्ता
1
डॉ. प्रा. श्री.निवृत्ती बाबुराव पवार
M.A. Ph.D
1972-1977









मु.पो. कुरुल
ता. मोहोळ
जि. सोलापूर
प्राचार्य
श्री.संत दामाजी कॉलेज, मंगळवेढा
2
श्री. जोतिर्लिंग गणपत पाटकर
B.E. Civil
1989-1994
उपकार्यकारी अभियंता
सोलापूर
3
श्री. कुलदीप दत्तात्रय बोंगे
B.A.
1999-2003
गट विकास अधिकारी, पंचायत समिती, अमरावती
अमरावती
4
श्री. विजय बाजीरंग साळुंखे
B.Sc LLB
1995-2000
कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायाधीश दिवाणी
सासवड
5
श्री. संतोष तात्या खंदारे
M.A. D.Ed
1996-2001
Asst. I.B. Officer Mumbai
मुंबई
6
श्री. अतुल वसंत खंदारे
B.A. D.Ed.
1996-2001
पोलीस उपनिरीक्षक (PSI)
गडचिरोली
7
श्री. सज्जन सौदागर वाघमोडे
B.A.
1994-1999
पोलीस उपनिरीक्षक (PSI)
येरमाळा
8
श्री. रोहित राजकर्ण घोडके
B.E. Electrical
2002-2007
ज्यू. इंजिनियर, महावितरण ग्रामीण
सोलापूर
9
श्री. सत्यजित भारत आंबरे
B.E.
2001-2006
सहाय्यक अभियंता महावितरण
मंगळवेढा
10
श्री. विजय किसनदेव पाटील
B.Sc. Agri
1997-2002
कृषी अधिकारी, बँक ऑफ बडोदा
अहमदाबाद


२०)  स्पर्धा परीक्षेतील यश
सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये NMMS परीक्षा इयत्ता ८ वी मधील कु. आंबरे सानिका मोहन ही विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पत्र.

२१)  विद्यालयाची जागा कोणी दिली
१)     कै. बाबुराव आप्पाराव बोंगे यांनी २ एकर जमीन
२)     कै. नामदेव आप्पाराव बोंगे यांनी २ एकर जमीन
३)     श्री. विश्वनाथ आप्पाराव बोंगे यांनी २ एकर जमीन


२२)  विद्यालयाची जागा मिळवण्यासाठी देणगीदारांची नावे
१)     कै. बाबुराव आप्पाराव बोंगे यांनी २ एकर जमीन
२)     कै. नामदेव आप्पाराव बोंगे यांनी २ एकर जमीन
३)     श्री. विश्वनाथ आप्पाराव बोंगे यांनी २ एकर जमीन

२३)  थोर देणगीदार
ü  सन १९९१ मध्ये श्री. विलासचंद मोतीचंद मेहता यांनी परमेश्वर पिंपरी येथील २३ एकर ११ गुंठे शेतजमीन बक्षिसपत्र रूपाने दिली.
ü  कै. बाबुराव आप्पाराव बोंगे यांनी २ एकर जमीन, कै. नामदेव आप्पाराव बोंगे यांनी २ एकर जमीन व श्री. विश्वनाथ आप्पाराव बोंगे यांनी २ एकर जमीन अशी एकूण ६ एकर जमीन बक्षीस पत्राने संस्थेस दिली.

२४)  गुणवंत विद्यार्थी तपशील

अ. क्र.
विद्यार्थी नाव
शेकडा गुण %
वर्ष
कु. क्षीरसागर चंदाराणी अशोक
९२.७३
२०१२-१३
कु. जाधव पूनम भीमराव
९२.०८
२०१३-१४
कु. जाधव ऐश्वर्या अरुण
९३.८०
२०१४-१५
कु. पाटील वैष्णवी जयसिंह
९३.४०
२०१५-१६
चि. धर्मशाळे आकाश धनाजी
९२.४०
२०१५-१६
कु. क्षीरसागर विद्याराणी अशोक
९०
२०१५-१६
कु. जाधव सोनाली केशव
९०.८०
२०१५-१६
कु. पाटील क्रांती विकास
९३
२०१५-१६
कु. पाटील प्रतिक्षा दिलीप
९२.८०
२०१५-१६
१०
कु. पवार सुप्रिया गोपिनाथ
९०.२०
२०१५-१६
११
कु. लिगाडे शितल सोमनाथ
९१
२०१५-१६
१२
कु. सलगर अश्विनी राजेंद्र
९२
२०१५-१६

२५)  विद्यालय बांधकाम देणगीदार
सन १९६४ पासून न्यू इंग्लिश स्कुल ची सुरुवात झाली.  कै. बाबुराव आप्पाराव बोंगे यांनी प्रत्यकी २ एकर प्रमाणे एकूण ६ एकर जमीन देऊन शाखेची मुहूर्तमेढ रोवली. प्रगतशिल बागायतदार प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते कै.मारुती (आबा) पाटील यांनी त्यांचे सहकार्याच्या मदतीने देणगी रूपाने मिळालेल्या ६ एकर जागेमध्ये ८ खोल्याची दगडी इमारत उभी केली. कै. आबा यांनी मुख्यमंत्री निधीतून २ लाख रु. व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ११०००/-रु. ची देणगी मिळविली व मा. श्री. पवार साहेब यांचेकडून मुख्यमंत्री फंडातून८०,०००/-रु. व ५०,०००/-रु. अशी दोनवेळा मदत मिळवून इमारत पूर्ण केली. कुरुल हनुमान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री. दगडू काशिनाथ लिगाडे यांनी सोसायटी दुकानातून रिकामा बारदाना विक्री करून येणारी रक्कम सुमारे ९०००० /- रु. संस्थेच्या बांधकामासाठी दिली.

२६)  इमारत बांधकामामध्ये संस्थेचे योगदान
    शेती विकासासाठी रक्कम सन १९९२ ते १९९६ या कालावधीत ७ लाख रुपये दिले. व इमारत बांधकामासाठी सन १९९१-९२ मध्ये ३ लाख रुपये दिले. व सन २०११-१२ मध्ये  ५ लाख रुपये दिले.


*****

No comments:

Post a Comment

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"