Menubar

अभिनंदन!! अभिनंदन !! अभिनंदन!! ✌🌹🥇🥇🥇🏆🏆 ⚜ रयत शिक्षण संस्थेचे, ⚜ न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल. ⚜ 💐💐💐💐💐💐💐💐 NMMS परीक्षा निकाल 2024 ✌💐💐🏆🥇🥇💐💐 !!! या वर्षी उत्तुंग यश !!! 💫 एकूण परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी - 47💫 ⭐ परीक्षेत पात्र विद्यार्थी - 30 💫 NMMS शिष्यवृत्ती धारक 2-विद्यार्थी 🏆सारथी शिष्यवृत्ती धारक - 16 विद्यार्थी 🥇🥇🥇2 विद्यार्थ्यांना 60,000 रुपये प्रमाणे 1,20,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार🥇🥇🥇 🏆सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी - 16 प्रति विद्यार्थी 38,400 रुपये प्रमाणे 6,14,400/रुपये शिष्यवृत्ती मिळणार.🏆👍👍👍 🥇🥇🏆🏆 एकूण 7,34,400/रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार🏆🏆🥇🥇 NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी ⭐ पाटकर रोहन अंकुश ⭐ कांबळे रोहन शंकर सारथी शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी - 16 ⭐ सरवळे प्रसन्न प्रशांत ⭐कु. जाधव प्रणाली काकासाहेब ⭐ कु.गायकवाड प्रशाली केराप्पा ⭐ पवार यश विजय ⭐ साळुंके सूर्यन संजयकुमार ⭐ जाधव समर्थ रामचंद्र ⭐क्षीरसागर शंभुराजे अविनाश ⭐ अवताडे प्रज्वल संभाजी ⭐ कु. घोडके समृद्धी हरिश्चंद्र ⭐ कु.जाधव जुई संजय ⭐ताड आदर्श बाळू ⭐ निकम प्रणव परमेश्वर ⭐ घोडके सुमित नितीन ⭐जाधव ओम संतोष ⭐ झिंजुर्डे मंथन मोहन ⭐ कु.साळुंखे संस्कृती समाधान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐 विभाग प्रमुख - श्रीमती. सुर्वे पी ए. सौ. माने एस. एम., श्री. खाडे व्ही. एन, श्री. बिराजदार ए. ए., श्री. बोईनवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक मा. श्री. मदने जे. पी., गुरुकुल विभाग प्रमुख श्री. खरात एन आर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल कुरूल स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती कुरूल पंचक्रोशीतील सर्व पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले 🏆🏆🥇🥇🥇🏆🥇🥇🥇🥇✌✌💐

Sunday, November 27, 2016

काही महत्वाचे फुल फॉर्म्स

1 PAN - पैशांच्या देवाणघेवाणीदरम्यान पॅनकार्डचा ओळखपत्र म्हणून फायदा होतो. मात्र या पॅनकार्डचा फुलफॉर्म आहे परमनंट अकाऊं नंबर(permanant account number).
2. PDF- अनेकांना पीड़ीएफचा फुलफॉर्म माहीत नसेल. पीडीएफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मट(portable document format)
3. HDFC -अनेकदा हा शब्द ऐकला असेल. HDFC म्हणजे 'हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (housing development finance corporation)
4. SIM - या शब्दाचा वापर 90 टक्के लोक करतात. मात्र नक्कीच तुम्हाला याचा फुलफॉर्म माहीत नसेल. सिमचा फुलफॉर्म सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module) असा आहे.
5. ATM - याचा वापर तर 10 पैकी 8 लोक करतात. एटीएमचा फुलफॉर्म ऑटोमेटेड टेलर मशीन(Automated Teller machine)
6. IFSC -याचा फुलफॉर्म आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड() Indian Financial System Code) आहे.
7. FSSAI(fssai) - याचा फुलफॉर्म आहे 'फुल सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया' )
8-Wi-Fi-
याचा फुलफॉर्म आहे 'वायरलेस फिडेलिटी'(wireless fidelity)
Some Fullforms of important words : -
1.) GOOGLE - Global Organization Of Oriented Group Language Of Earth.
2.) YAHOO - Yet Another Hierarchical Officious Oracle.
3.) WINDOW - Wide Interactive Network Development for Office work Solution.
4.) COMPUTER - Common Oriented Machine Particularly United and used under Technical and Educational Research.
5.) VIRUS - Vital Information Resources Under Siege.
6.) UMTS - Universal Mobile Telecommunicati ons System.
7.) AMOLED - Active-matrix organic light-emitting diode.
8.) OLED - Organic light-emitting diode.
9.) IMEI - International Mobile Equipment Identity.
10.) ESN - Electronic Serial Number.
11.) UPS - Uninterruptible power supply.
12. HDMI - High-Definition Multimedia Interface.
13.) VPN - Virtual private network.
14.) APN - Access Point Name.
15.) SIM - Subscriber Identity Module.
16.) LED - Light emitting diode.
17.) DLNA - Digital Living Network Alliance.
18.) RAM - Random access memory.
19.) ROM - Read only memory.
20.) VGA - Video Graphics Array.
21.) QVGA - Quarter Video Graphics Array.
22.) WVGA - Wide video graphics array.
23.) WXGA - Widescreen Extended Graphics Array.
24.) USB - Universal serial Bus.
25.) WLAN - Wireless Local Area Network.
26.) PPI - Pixels Per Inch.
27.) LCD - Liquid Crystal Display.
28.) HSDPA - High speed down-link packet access.
29.) HSUPA - High-Speed Uplink Packet Access.
30.) HSPA - High Speed Packet Access.
31.) GPRS - General Packet Radio Service.
32.) EDGE - Enhanced Data Rates for Globa Evolution.
33.) NFC - Near field communication.
34.) OTG - On-the-go.
35.) S-LCD - Super Liquid Crystal Display.
36.) O.S - Operating system.
37.) SNS - Social network service.
38.) H.S - HOTSPOT.
39.) P.O.I - Point of interest.
40.) GPS - Global Positioning System.
41.) DVD - Digital Video Disk.
42.) DTP - Desk top publishing.
43.) DNSE - Digital natural sound engine.
44.) OVI - Ohio Video Intranet.
45.) CDMA - Code Division Multiple Access.
46.) WCDMA - Wide-band Code Division Multiple Access.
47.) GSM - Global System for Mobile Communications.
48.) WI-FI - Wireless Fidelity.
49.) DIVX - Digital internet video access.
50.) APK - Authenticated public key.
51.) J2ME - Java 2 micro edition.
52.) SIS - Installation source.
53.) DELL - Digital electronic link library.
54.) ACER - Acquisition Collaboration Experimentation Reflection.
55.) RSS - Really simple syndication.
56.) TFT - Thin film transistor.
57.) AMR- Adaptive Multi-Rate.
58.) MPEG - moving pictures experts group.
59.) IVRS - Interactive Voice Response System.
60.) HP - Hewlett Packard.

Sunday, November 13, 2016

चला लोगो बनवूया


चला लोगो बनवूया


प्रथम play store मधून pics Art app घ्या 
👇👇👇👇👇👇
App open करा 
खाली + टच करा 
खाली draw सिलेक्ट करा 
Blank निवडा
Template मधून size निवडा
उदा.-2048 × 2048
सिलेक्ट केलेले width व Height येथे दिसते 
मग orientation निवडा उभे की आडवे 
मग ok करा
आता blank page दिसेल 
खाली 6 नं ला दिलेल्या आकृतीला सिलेक्ट करा 
आता समोरील आकृती मधील गोल निवडा व size कमी जास्त करून घ्या 
आता stroke सिलेक्ट करा व ok करा 
आता परत आपले blank page दिसेल 
आता गोल draw करा size हवी तेवढी ठेवा 
परत अजून एक गोल त्याच  गोलात  काढा 
आता परत खाली 6 नं चे  निवडा
गोल निवडा व खाली fill निवडा ok करा
आता खालील 1 नं वरील रंगीत चौकोन निवडा यातील हवा तो रंग सिलेक्ट करा व ✅ या वर टिक करा 
आता परत आपण गोल काढला ते पान दिसेल त्याच्या आत  परत गोल काढा 
तुम्ही जो रंग निवडला त्याच रंगाचा गोल येथे दिसेल
आता वरती Done करा 
मग तुम्हाला खाली 2 option येतील त्यातील Edit Image सिलेक्ट करा 
आता आपला तयार गोल व खाली नवीन option दिसतील(tools)
  खालील 4 नं मधील add फोटो टच करा 
आता फोटो निवडा व वरती Add ला टच करा 
आता तुम्हाला तुम्ही निवडलेला फोटो दिसेल 
आता खालील 5 नं चे Shape select करा 
आता खाली विविध आकार दिसतील
यातील गोल निवडा व फोटो जवळील बाणाने गोलाची size हवी तेवढी करून घ्या 
खाली size हा option आहे व शेजारी colour बॉक्स आहे त्याप्रमाणे size व रंग निवडा 
मग वरती उजवीकडे कोपऱ्यात➡आहे तो टच करा आता गोलात फोटो दिसेल 
आता उजवीकडे कोपऱ्यातील  ✅ टच करा
आपण तयार केलेल्या पहिल्या रंगीत गोलात निवडलेला फोटो गोलात दिसतो 
आता हा फोटो size कमी जास्त करून बरोबर गोलाच्या मध्यभागी ठेवा
(जर हा फोटो नको असेल तर फोटोवर डावीकडे वरती ❌ हे चिन्ह गोलात दिसते ते टच केले की फोटो कट होतो)
आता फोटो गोलात मध्यभागी adjust केल्यावर वरती उजवीकडे ✅टच करा
आता बघा - पहिल्या रंगीत गोलात आपण सिलेक्ट केलेला फोटो मध्यभागी दिसतो 
आता खालील 9 नं चे (T) Text निवड व type करा व वरील उजवीकडील ✅ टच करा 
तुम्ही type केले फोटोच्या वर किंवा खाली घ्यायचे ते ठरवा 
मग खालील फॉन्ट निवडा व colour निवडा 
आता खालील शेवटी असलेले Bend निवडा
Bend डावीकडे वा उजवीकडे adjest करा 
आता परत वरती + मधील text घ्या व परत हीच कृती करा 
आता यातील sticker निवडा व रंगीत गोलावर adjest करा (त्याची size लहान मोठी करता येते व रंग ही बदलता येतो)
आता आपला लोगो तयार 
 वरील उजवीकडील ✅ ok करा
आता काही बदल करायचा ते पहा व त्याप्रमाणे बदल करा 
नसेल तर वरील उजवी कडील ✅ ok करा 
आता तयार लोगो व त्याखाली पर्याय दिसतील 
त्यातील gallery निवडा 
तुमचा तयार लोगो gallery मध्ये save होतो 

Saturday, November 12, 2016

चला VDO बनवूया भाग 2

आपल्या जवळ स्मार्ट फोन असेल तर आपला वर्ग स्मार्ट .मोबाईल द्वारे vdo मेकिंग .आपल्या वर्गासाठी आपणच .vdo तयार करुया .आणि आपल्या वर्गाची गुणवत्ता वाढवूया .💐🌺💐
▶ Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज vdo .
2) शैक्षणिक vdo
▶ आपल्या कडे viva vid eo app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या ▶Viva video ओपन करा
▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .
▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे
▶ सर्व photo done करा
▶ Video बोर्ड येईल
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील
▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल
▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो
▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .
▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का
▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
 ▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का
▶ Vdo च्या वरील बाजूस ✅अशी खूण आह.आहे का
▶ वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा
▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा
▶ एक स्लाइड संपताच vdo च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल
▶ नंतर vdo च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल
▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा kruti करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
▶[ Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .
▶ तो vdo draft मधे सेव करा
▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .शेअर करु नका .
▶ आता थांबु या vdo तयार झाला झाला.
*All d best* 👍करा तयार video....

Sunday, November 6, 2016

चला स्वतःचे VDO बनवूया

चला स्वतःचे VDO बनवूया



स्मार्टफोनवरील कॅमेऱ्याच्या वाढत्या क्षमतेमुळे प्रत्येक घडामोडीचे चित्रीकरण करण्याकडे कल वाढत चालला आहे. अगदी लग्नसोहळय़ातील ‘कॅण्डीड’ क्षणांपासून घरातल्या घरात झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीपर्यंतच्या घटनांचे या कॅमेऱ्यानिशी ‘व्हिडीओ रेकॉर्डिग’ करण्यात येते. हॅण्डीकॅम किंवा डिजिटल कॅमेऱ्यांनिशी स्वत:च चित्रीकरण करणारेही अनेक आहेत. पण केवळ ‘व्हिडीओ रेकॉर्ड’ करून तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करता येत नाही. त्या आठवणी अधिक खुलवण्यासाठी ‘व्हिडीओ एडिटिंग’ करावेच लागते. सर्वसामान्य वापरकर्ते आपल्याला जमेल त्या पद्धतीने ‘व्हिडीओ एडिटिंग’ करतात किंवा बाजारात कोणत्याही फोटोग्राफरकडे जाऊन व्हिडीओ एडिटिंग केले जाते. मात्र, पहिल्या पद्धतीत व्हिडीओचे संपादन चुकण्याची भीती असते तर दुसऱ्यात पैसे मोजावे लागतात. अशा वेळी संगणकावर उपलब्ध असलेले मोफत पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर एक चांगला पर्याय ठरू शकतात. अशाच काही महत्त्वाच्या ‘व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर’विषयी..

विंडोज मूव्ही मेकर

कोणत्याही संगणकासोबत मोफत इन्स्टॉल होऊनच उपलब्ध असलेला ‘विंडोज मुव्ही मेकर’ हे अतिशय उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन आहे. संगणकावरील व्हिडीओ क्लिप्स केवळ ‘क्लिक’ आणि ‘ड्रॅग’ करून एडिटिंग करता येते. एका वेळी अनेक व्हिडीओ ‘क्लिक’ आणि ‘ड्रॅग’ केल्यानंतर ते निवडलेल्या क्रमाने दर्शवले जातात. त्यानंतर या व्हिडीओला ‘साउंडट्रॅक’ जोडणे, कॅप्शन नोंदवणे, व्हिडीओची श्रेयनामावली तयार करणे अशा गोष्टी करता येतात. याशिवाय व्हिडीओ ‘क्रॉप’ करणे, त्यातील रंगसदृशता कमी-अधिक करणे अशा नेहमीच्या सुविधाही विंडोज मूव्ही मेकरमध्ये उपलब्ध आहेत. हे व्हिडीओ ‘सेव्ह’ करून थेट ‘यूटय़ूब’वर अपलोडही करता येतात.

केट्स व्हिडीओ टूलकिट

रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओचे ‘एडिटिंग’ करणे अतिशय कौशल्याचे काम असते. मात्र, व्हिडीओची लांबी कमी करणे, ठरावीक दृश्य कापणे, त्यातील रंगात कमी-अधिक करणे अशा गोष्टी आपल्याला सहज शक्य असतात. ‘केट्स व्हिडीओ टूलकिट’मध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तुम्ही एका व्हिडीओचे दोन व्हिडीओ करू शकता किंवा दोन व्हिडीओ एकमेकांना जोडूही शकता. याशिवाय साउंडट्रॅक जोडणे, कॅप्शन नोंदवणे, श्रेयनामावली तयार करणे अशा गोष्टींसाठी या अ‍ॅप्लिकेशनमध्ये सुविधा उपलब्ध आहे.

विवा व्हिडीओ

अलीकडे अनेक अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर संगणकावर इन्स्टॉल न करता क्लाउड तंत्रज्ञानाच्या आधारे सव्‍‌र्हरवर साठवून तेथून हव्या त्या उपकरणावर वापरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. संगणकावरील हार्डडिस्कची जागा व्यापली जाऊ नये म्हणून अनेक जण आपले सॉफ्टवेअर ‘क्लाउड’वर इन्स्टॉल करतात. त्यामुळे जागा वाचतेच शिवाय हवी तेव्हा हव्या त्या संगणकावरून संबंधित सॉफ्टवेअर वापरता येते. अशाच सॉफ्टवेअरमध्ये ‘वीव्हिडीओ’चे नाव घेता येईल. फेसबुक, ट्विटर, यूटय़ूबसारख्या समाजमाध्यम संकेतस्थळांवर व्हिडीओ शेअर करण्यासाठी हे सॉफ्टवेअर अतिशय उपयुक्त आहे. या अ‍ॅप्लिकेशनसोबत पाच जीबीची क्लाउड स्पेसही मिळते. यावर व्हिडीओ एडिटिंगसाठी ‘स्पेशल इफेक्ट’ही पुरवण्यात आले आहेत.

एव्हिडमिक्स

व्हिडीओ जोडणे, तोडणे, लोगो टाकणे, क्रॉप करणे, व्हिडीओ रोटेट करणे, रंगछटा बदलणे अशी अनेक कामे करणारा एव्हिडमक्स हा छोटा पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर आहे. यामध्ये व्हिडीओ एडिटिंगच्या सामान्य सुविधा उपलब्ध आहेतच; पण स्पेशल इफेक्टचे पर्यायही येथे उपलब्ध आहेत.

व्हीएसडीसी फ्री व्हिडीओ एडिटर

अवघ्या ३२७ केबी आकाराचा हा व्हिडीओ एडिटर छोटा असला तरी त्याची कार्यक्षमता दांडगी आहे. या सॉफ्टवेअरमध्ये एकाच वेळी अनेक व्हिडीओ ‘ओपन’ करता येतात. कट, कॉपी, पेस्ट, क्रॉप, ट्रिम अशा नेहमीच्या पर्यायासोबतच साउंडट्रॅक जोडणे, कॅप्शन टाकणे अशा अनेक गोष्टी या एडिटरच्या मदतीने करता येतात. मात्र, या व्हिडीओ एडिटरवर फक्त ‘एव्हीआय’ फाइल्सच एडिट करता येतात.

Saturday, November 5, 2016

शिक्षकांसाठी उपयोगी वेबसाईट

शिक्षकांसाठी उपयुक्त वेबसाईट्स

"आई वडिलांबरोबर ज्याना 'आचार्य देवो भव' म्हणून मान दिला जातो तो शिक्षकी पेशा वर वर दिसतो तेवढा साधा नाही. दिलेला विषय,आणि त्यातला दिलेला अभ्यासक्रम शिकविण्याची पाऊण/ अर्धा तासांची पाठी टाकला की झाला पगार लागू असं म्हणून कार्य करण्याचे हे क्षेत्रच नव्हे. आपल्या हातुन आजचे लहानगे विद्यार्थी शिकताहेत आपण त्याना उद्याचे देशकर्ते महणून उभे करीत आहोत ही जाणीव मनात ठेवून जे शिक्षक मित्र सतत धडपड करत असतात अशांसाठी काही उपयूकत वेबसाईट्स ......."
http://www.education-world.com
वर्गात शि‍कवित असताना अनंत अडचणी सतत येत असतात. एखादा घटक कसा शिकवावा म्‍हणजे विद्यार्थ्‍याना लवकर समजेल?  कोणते शैक्षणिक साहित्‍य वापरावे म्‍हणजे अध्‍यापन प्रभावीपणे होईल? असे अनेक प्रश्‍न कृतिशिल शिक्ष्‍ाकाना सतत भेडसावत असतात. अशावेळी जर आपण Education world या सारख्‍या वेबसाईटचा उपयोग करुन घेतला तर अध्‍यापन करताना खूपच मदत होणार आहे.         ही साईट शिक्षकांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त असे साईट आहे. यावर पाठनियोजन, अभ्‍यासक्रम, अध्‍यापनाचे विविध तंत्रज्ञान उत्‍कृष्‍टपणे मांडलेले आहे. असे हे बहुपयोगी वेबसाईटला एखदा आवश्‍य भेट द्याच.
http://www.teacherfreebies.com/
 Teacherfreebies  या नावाप्रमाणाचे हे वेबसाईट शिक्षक मित्रांसाठी १०० हून अधिक साहित्‍य उपलब्‍ध करुन देते तेही अगदी मोफत. या वेबसाईटचे आणखिन एक वैशिट्य  म्‍हणजे पुस्‍तकापासून ते थेट कॅटलॉग पर्यंतचे सर्व साहित्‍य चक्‍क मोफत मिळते. शिक्षणाविषयी नवनविन बातम्‍या, शोध, अध्‍यापन तंत्रे, विद्यार्थ्‍याना आकर्षित करुन घेण्‍यासाठी वापरावयाचे विविध साहित्‍य,साधने अतिशय सुटसुटीत मांडणी या साईटमध्‍ये आढळते. मला आवडलेल्‍या साईटमधून हे एक साईट आहे. या साईटमध्‍ये शिक्षकांसाठी असलेले विविध साईटचे खुप मोठी लिस्‍ट या मध्‍ये दिलेली आहे.
http://discoveryschools.com/
 हा साईट खास करुन विद्यार्थी, शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी डिझाईन केलेला आहे. जरी सर्वांसाठी सेवा उपलब्‍द करुन देत असला तरी शिक्षकांसाठी अनेक उपयुक्‍त सदर या वेबसाईटमध्‍ये अनेक ठिकाणी आढळून येतात. लेसन प्‍लॅनपासून ते अध्‍यापन साहित्‍यापर्यंत अनेक गोष्‍टी आढळून येतात. तसेच अनेक वेबसाईटचे लिंकही सुंदरप्रकारे देण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. अनेक शैक्षणिक गेम्‍स, पझल्स, मेज अशाप्रकारे बुध्‍दीला खुराक देणारे विविध साधनेही हा वेबसाईट पुरविण्‍याचा प्रामाणिक प्रयत्‍न केल्‍याचे दिसून येते.
http://www.teachervision.fen.com/
शिक्षकांना जे शिकवावे लागते ते सर्व बाबी या वेबसाईटमधून मिळते. हे वेबसाईटचे वर्णन Learning Network  करते. या वेबमध्‍ये नवनविन पध्‍दती, विद्यार्थ्‍याना आकर्षित करतील असे माहिती, कोडी, विविध विषय सोपे करुन कसे सांगावे याचे टिप्‍स असे वैविध्‍दपूर्ण मांडणी या साईटचे वैशिट्य म्‍हणावे लागेल.
आणखिन काही वेबसाईट्स    www.teacherpathfinder.org  www.connectingstudents.com  www.padhaee.com  www.teachnet.com

क्षणापासून मनापर्यंत

पुढच्या क्षणी आपण असू की नसू याची खात्री माणसाला देता येत नाही. तरीही तो आपल्या भविष्याविषयी चिंताग्रस्त, आपल्या कर्तृत्वाविषयी तणावग्रस्त आणि आपल्या प्रॉपर्टीविषयी भयग्रस्त स्थितीत का असतो, हे लक्षात येत नाही. या तिन्ही दिशांनी त्याचे लक्ष सतत विचलित केल्याने हाती घेतलेले कोणतेही काम तो नीट पूर्ण करू शकत नाही. त्याने खरी काळजी घेतली पाहिजे ती आजच्या दिवसाची, हातातल्या कामाची, आत्ताच्या क्षणाची. या क्षणी जर तो शरीराने आणि मनाने सक्षम असला तरच जगण्याचा आनंद व्यवस्थित घेऊ शकतो आणि हातातील कामही यशस्वीपणे पूर्ण करू शकतो.
एक आजीबाई आयुष्यात प्रथमच पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाल्या. जाण्यापूर्वी आपले सारे दाग-दागिने एकत्र करून त्यांनी ते गाठोडे शेजारणीकडे ठेवले. पण त्या जसजशा पंढरीच्या दिशेने पुढे सरकत होत्या तसतसे त्यांचे मन त्या गाठोड्याच्या दिशेने मागे मागे जात होते. आपले दागिने चोरीला गेले तर आपले पुढे काय होईल या भीतीने त्या इतक्या ग्रस्त होत्या की पांडुरंगाच्या जागी त्याना ते दागिन्यांचे गाठोडेच दिसायला लागले.
असेच एक सद्गृहस्थ आजारी वडिलांना भेटण्यासाठी ट्रेनमध्ये बसून निघाले होते. ते इतके टेन्शनमध्ये होते की बसताना ते आपली बॅग डोक्यावर घेऊन बसले. शेजारी म्हणाला, बॅग वर किंवा पायाखालच्या जागेत ठेऊ शकता. त्यावर ते सद्गृहस्थ काय म्हणतात? माझे तिकीट काढले आहे; बॅगेचे नाही! बॅग डोक्यावर ठेवल्याने त्यांचे टेन्शन कमी कसे होणार होते हे त्या पांडुरंगालाच ठावे.
विचलित न होता हाती घेतलेल्या कामात पूर्णपणे बुडून जाणारा किंवा चालू क्षणांना आनंदाने सामोरे जाणारा माणूस आपोआप यशाच्या मुक्कामी पोहोचतो. विद्यार्थी असो, खेळाडू असो, चित्रकार असो, गायक असो, शिक्षक असो वा आणखी कोणी असो, कामात पूर्ण लक्ष घातले की तो यशस्वी होणार हे नक्की. बर्फ जसा पाण्यात विरघळतो किंवा तेल आणि वात जसे पूर्णपणे एकरूप होऊन प्रकाश देण्याचे काम करतात, तसे माणसाने कामाशी एकरूप झाले पाहिजे.
आजीबाईनी गाठोड्याचा विचार डोक्यातून काढून टाकणे किंवा त्या गृहस्थाने डोक्यावरचे ओझे खाली उतरून ठेवणे आवश्यक होते. आजीबार्इंनी विठ्ठलाचे नामस्मरण करत राहणे आणि त्या गृहस्थाने वडिलांना आराम पडावा म्हणून औषधोपचारांचे नियोजन करत, सद्भावनांचे वलय विस्तारत ठेवणे अधिक महत्वाचे होते.
-प्रल्हाद जाधव

Download Our App

Download Our App
Neskurul App

Friday, November 4, 2016

*NPS(National pension system पूर्वीची DCPS) बाबत सातव्या वेतन आयोगाच्या महत्वपूर्ण शिफारशी*



*NPS(National pension system पूर्वीची DCPS) बाबत सातव्या वेतन आयोगाच्या महत्वपूर्ण शिफारशी*

_*nps काय आहे जाणूुन घ्या पोस्ट मोठा आहे वाचा एकदा_

सन 2005 नंतर शासनाच्या सेवेत आलेल्या सर्व अधिकारी/कर्मचार्‍यांना पूर्वीच्या पेन्शन योजनेऐवजी NPS ही नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे.

या योजनेची काही वैशिष्ठे खालीलप्रमाणे-

Tire-1
1.Basic +grade pay+d.a. च्या 10%रक्कम वेतनातून तसेच तितकीच (10%)रक्कम शासन जमा करते व यावर प्रचलित व्याजदरा प्रमाने व्याजदेखील जमा होते.

2.निवृत्तीच्या वेळेस जमा रक्कमेपैकी 60%रक्कम रोख स्वरूपात दिली जाते तर 40% रक्कम  purchase of annuity साठी गुंतवावी लागते.

शासनाने ठरवून दिलेले तिन प्रोफेशनल पेन्शन फंड मॅनेजर्स हया रक्कमेची  गूंतवणूक करतात व यातून आयूष्यभर पेन्शन दिली जाते.

3. purchase of annuity च्या 40%रक्कमेपैकी 55% सरकारी रोख्यात,40%रक्कम कॉर्पोरेट कर्जरोख्यात तर 5% रक्कम नाणे बाजाराच्या साधनात  गूंतविली जाते.

4.सेवेच्या 10 वर्षानंतर  यातील 25 %रक्कम विशेष कारणासाठी निवृत्तीपूर्वी  तीन टप्प्यात काढता येते.माञ दोन टप्यातील अंतर 5 वर्षापेक्षा कमी असता कामा नये.

5.सेवेत असताना मृत्यू आल्यास जमा रक्कमेच्या 80% रक्कम गूंतविली जाते तर 20%रक्कम वारसाला दिली जाते.

6.जमा रक्कमेसाठी कोणताही कर लागू नाही माञ purchase of annuity च्या वेळेस सेवा कर द्यावा लागेल तसेच निवृत्तीच्या वेळस मिळालेली रक्कम देखील taxable income असेल.

Tire-2 (ऐच्छिक स्वरूपात)
1) यामध्ये कर्मचार्‍याला रक्कम गूंतविता येईल माञ यामध्ये शासनाचा कोणताही हिस्सा राहणार नाही.

2)या रक्कमेवर प्रचलित व्याजदराप्रमाणे व्याज दिले जाईल तसेच केव्हा ही,कितीही वेळा ही रक्कम काढता येईल.यावर कोणतेही बंधन असणार नाही.

जूनी पेन्शन योजना व NPS यामधील फरक-
1.ops (old pension system) मध्ये कर्मचार्‍याला कोणतीही रक्कम जमा करावी लागत नव्हती nps मध्ये 10%रक्कम जमा करावी लागते.

2.ops मध्ये निवृत्तीनंतर last pay withdrawl च्या जवळपास 50%पेन्शन दरमहा मिळते तर nps मध्ये दरमहा  किती पेन्शन मिळणार हे तत्कालीन आर्थिक स्थिती,तूमची जमा रक्कम व तूमच्या फंड मॅनेजरच्या वित्तिय कौशल्यावर हे अवलंबून राहणार.

म्हणजे पेन्शन किती मिळणार  याबाबत अनिश्चितता.

3.ops मध्ये gpf refundable or non refundable च्या माध्यमातून रक्कम अडचणीच्या वेळी कर्मचार्‍याला काढता येते.

तर nps मध्ये ही रक्कम 25%च्या मर्यादेत फक्त तीन वेळा काढता येते.

4.निवृत्तीनंतर gpf ची पूर्ण रक्कम व्याजासह मिळते तर nps ची 60% रक्कम रोख स्वरूपात व्याजासह मिळते.

5.ops मध्ये निवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम ही पूर्णपणे tax free आहे तर nps मध्ये purchase of annuity च्या वेळेस सेवा कर द्यावा लागेल तसेच निवृत्तीच्या वेळस मिळालेली रक्कम देखील taxable income
असेल.

आता सातव्या वेतन आयोगासमोर संघटनेने,तज्ञांनी  nps च्या विरोधात केलेले भाष्य,

केलेल्या मागण्या व त्यावर आयोगाने केलेल्या शिफारशी -
मागण्या-

1.जून्या आणि नविन कर्मचार्‍यामध्ये भेदभाव होत असल्यामूळे nps रद्द करावी.

2. भविष्यकालीन मिळणारी पेन्शनचे वास्तविक मूल्य हे नाणे बाजार व भांडवली बाजारातील(market related risks) धोक्याशी संबंधित असल्यामूळे अनिश्चित आहे.

3.वेतनातून 10% कपात होत असल्यामूळे कर्मचार्‍याला कमी पगार मिळणार.

4.याबाबतची परीणामकारक अंमलबजावणी यंञणा 11 वर्षानंतरही set up न झाल्यामूळे संभ्रम निर्माण झालेला आहे.

5.कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास family pension बाबत खाञी नाही आणि त्यातल्या त्यात सुरवातीच्या काळात कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास मिळणारी रक्कम ही अपूरी असून त्यात उदरनिर्वाह करणे कठीण आहे.

6.gpf प्रमाणे saving ची सूविधा उपलब्ध नाही.त्यामूळे फक्त शासनाचा हिस्सा (10%) हा purchase of annuity साठी वापरण्यात यावा व तो हिस्सा वाढविण्यात यावा.

7.gpf प्रमाणे परतावा अग्रीम घेण्याची सूविधा nps मध्ये नसल्यामूळे अचानक उद्गभवलेले खर्च भागविण्यासाठी इतर मार्गाने कर्ज काढावे लागेल.त्यामूळे कर्जबाजारीपणा वाढेल.

8.nps मध्ये purchase of annuity च्या वेळेस सेवा कर द्यावा लागेल तसेच निवृत्तीच्या वेळस मिळालेली रक्कम देखील इतर उत्पन्नासोबत taxable income म्हणून गणली जाणार.

9.ops प्रमाणे annuity मध्ये भाव वाढीचा विचार केला जात नाही.तसेच प्रत्येक वेतन आयोगात मूळ पेन्शनचा घेतला जाणारा आढावा nps मध्ये घेतला जात नाही त्यामूळे त्याचा कोणताही लाभ कर्मचार्‍याला मिळत नाही.

10.nps मध्ये कर्मचार्‍याला त्याचे फंड मॅनेजर्स performance प्रमाणे निवडण्याचे स्वांतञ्य नाही.
11.10%+10% ही रक्कम पूरेशी नसून यामध्ये त्यास अंतीम वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन मिळत नाही.
आयोगाने या सर्व बाबींचा अभ्यास करून खालील शिफारशी केलेल्या आहेत.

1.annuity च्या गूंतवणूकीसाठी जीवनचक्र दृष्टीकोणाचा वापर करण्यात यावा.

संमिश्र गूंतवणूकीसाठी कर्मचार्‍याला अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात यावेत.

2. अंशदानाची रक्कम (10%+10%) ही वाढविण्याबाबत तज्ञ गट नेमून याचा फेर आढावा घेण्यात यावा व गरज असल्यास त्याप्रमाणे सूधारणा करावी.

3.शासनाकडून अंशदानाची रक्कम जमा करण्यात दिरंगाई होता कामा नये.
याबाबत कालबध्द कार्यक्रम आखून तक्रारीचा निपटारा करावा.

4.nps ची tire-2 तात्काळ लागू करण्यात यावी.

5.nps च्या अंमलबजावणीसाठी सचिव स्तरावर समिती स्थापून प्रगतीबाबतचा नियमित आढावा घेण्यात यावा.तसेच npsच्या वैयक्तिक तक्रारीसाठी लोकपालाची स्थापना करण्यात यावी.

6.nps मध्ये purchase of annuity च्या वेळेस सेवा कर लावण्यात येऊ नये तसेच निवृत्तीच्या वेळस मिळालेल्या
रक्कमेवर देखील कोणताही कर आकारु नये.

7.कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास वा इतर कारणाने तो nps मc धून बाहेर पडल्यास अतिरीक्त मदतीबाबत वेगळी योजना सुरू करावी.

8.nps बाबत असणारी अनिश्चितता दूर करण्यासाठी यंञणा निर्माण करण्यात यावी तसेच केलेले बदल,भविष्यात करण्यात येणारे बदल यास मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देऊन असणारा संभ्रम दूर करण्यात यावा.

Thursday, November 3, 2016

आयुर्वेद


संपूर्ण आयुर्वेद एकाच मेसेज मध्ये.....
*चरबी कमी करा*
* शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
* साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये.
*प्रमाण वजन करूनच घ्यावे.

*कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
* हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
*फायदे :
• जुनाट वातविकार कायमचा जातो.
• हाडे मजबूत होतात.
• काम करण्यास स्फूर्ती येते.
• डोळे तेजस्वी होतात.
• केसांची वाढ होते.
• जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
• रक्ताभिसरण चांगले होते.
• कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
• हृदयाची कार्यक्षमता वाढते.
• बहिरेपणा दूर होतो.
• बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
• अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.
• दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
• रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
• नपुंसकता असेल तर ती दूर होते.
• ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.
• मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.
• त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
• स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.
• शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
• शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
• त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
• कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर
कृपया वाचा आणि लिहुन ठेवा
●●●● उपयोग होईल ●●●●

▪▪..आरोग्य टिप्स..▪▪
१) अम्लपित्त वाढलले असता ऊस खावे अथवा ऊसाचा रस प्यावा त्वरीत पोट साप होते. तसेच ऊस जेवना पुर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.

2) आवाज बसला असता बारीक वस्त्रगाळ केलेला कात दोन घोट पाण्या सोबत घ्यावा त्वरीत घसा साफ होतो.

3) काविळ झाला असल्यास एक आठवडाभर रोज एक-दोन ऊस चाऊन खावे, किंवा दिवसातून ३/४ ग्लास ऊसाचा रस घेतल्याने रक्त तयार होण्याची क्रिया चालु होउन रूग्न बरा होतो. तसेच ताज्या गुळवेलीचा रस २० ग्रॅम खडीसाखर घालुन घेतल्यास सुध्दा काविळ बरा होतो.

४) सतत कान फुटत आसल्यास ऊसाचे कांडे गरम करून नंतर त्याचा रस काढून दोन- तिन चमचे कानात पिळल्यास कान फुटने कायमचे बंद होते.

५) केस येण्यासाठी व कोंडा नाहीसा होन्यासाठी :– वडाच्या कवळ्या पारंब्या वाटुन १०० ग्रॅम लगदा करावा त्यात एक लिटर तिळाचे तेल व ५० मि.ली. लिंबरस घालुन मंदाग्नीवर कढवावे. नुसते तेल राहीले असता ते गाळुन घ्यावे हे तेल नियमीत लावल्याने नविन केस यायला सुरूवात होते. व कोंडा सुध्दा नाहिसा होतो.

६) मुख दुर्गंधी :- तुरटिच्या पाण्याने गुळण्या केल्याने मुख दुर्गंधी तर जातेच व तोडाचे सर्व आजार सुध्दा दुर होतात.

७) दात दुखी :- वडाच्या पारंबिचे दातवन केल्याने दाताचे सर्व आजार बरे होतात. दाताचे किडने थांबते, दाताचे कवच पुन्हा तयार होते.
८) दमा :- दम्याचा त्रास असनाऱ्या रूग्नाने लवंग तोंडात ठेउन ति नरम झाल्यास खावी, असे एक-एक तासाने एक-एक लवंग खात रहावे दमा कमी कमी होत जाउन १/२ महिन्यात कायमचा नाहिसा होतो.

९) पोट साफ होण्यासाठी :- लसणच्या ८/१० पाकळ्या वाटुन तुपात तळुन सैधव लावुन दिवसातुन १/२ वेळेस खाल्याने पोट साप होते. तसेच तिळाचे तेल रोज अनशा पोटी २० मिली घेतल्याने पोट साप तर होतेच पण पोटाचे आन्सर सुध्दा बरे होतात.

१०) पोट दुखी :- आल्याचा रस, लिंबाचा रस व सैधव किंवा पादेलोन घालुन घेतल्याने पोट दुखायचे थांबते. तसेच हे मिश्रन रोज जेवना पुर्वी घेतल्याने अन्न पचन होन्यास मदत होते. हा उपक्रम जर एक वर्ष चालु ठेवला तर घशा पासुन गुद्दव्दारा पर्यत कॅन्सरची बाधा कधीच होनार नाही.

११) ब्लडप्रेशर :- ६/७ लसणाच्या पाकळ्या आर्धा लिटर पाण्याच्या बाटलित टाकुन ति बाटलित हालवावी व नंतर दोन तास ठेवावी व त्या नंतर जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा हे पाणी प्यावे याने हाय बल्डप्रेशर कमी होउन नॉर्मल होतो.

१२) मुळव्याध :- रोज सकाळी तुळशीची पाने खल्याने मुळव्याध बरा होतो.

१३) मुतखडा :- पानफुटिचे पान व सोबत एक काळा मिरा असे दिवसातुन तिन वेळा खाल्याने मुतखडा १५ दिवसात गळुन पडतो.

▪-: नोट :-▪
मुतखडा असलेल्या व्यक्तीनी खालील वस्तु खावु नये –
    १) आवळा
२) चिकु
३) भेंडी
   ४) पालक
५) गोबी
     ६) काकडी
    ७) स्ट्रॉबेरी
                ८) वाटान्याच्या शेंगा
  ९) टोमॅटो
      १०) काळी द्राक्षे
११) काजु
१२) कॉफी पिउ नये
१३) मशरूम
१४) वांगे.
कारण यात खूप कॅल्शियम जास्त असते.

▪माहीती संकलन व प्रसारण ▪
हिन्दवी चँरिटेबल ट्रस्ट
- इंद्रायणीनगर-भोसरी - पुणे

## हार्ट अटॅक ##???
घाबरू नका..!!!
सहज सुलभ उपाय...!
99 टक्के ब्लॉकेजेसना काढून टाकणारे पिंपळाचे पान...
💚15 पिपळळाची पाने जी गुलाबी नसावीत, पण हिरवी,
कोवळी, चांगली वाढलेली असावीत...
प्रत्येक पानांचे
वरचे टोक व खालचा जाड देठ पानाचा थोडाश्या भागासकट कापून टाका, मग सर्व पंधरा पाने
स्वच्छ धुवून घ्या.
एका भांड्यात ही पाने व एक ग्लास पाणी घालून मंद आचेवर उकळत ठेवा.
जेव्हा पाणी(1/3)एक त्रितीयांश उरेल तेव्हा उकळवणे बंद करा व गाळून घ्या...
नंतर थंड जागी ठेवा.
झाले आपले औषध तयार...!
☕...☕...☕हा काढा 'तीन भागात' प्रत्येक तीन तासांनी
सकाळपासून घ्यावयाचा आहे.
💔हार्ट अटॅक नंतर लागोपाठ पंधरा दिवस अशा प्रकारे पिंपळकाढा घेतल्याने
ह्रदय पुनः स्वस्थ होते.
💝 व पुन्हा हा दौरा पडण्याची
शक्यता राहात नाही...
ह्रदय विकारी व्यक्तींनी ह्या ईलाजाचा प्रयोग अवश्य करून पहावा..
यातून कोणताही
साईड इफेक्ट होत नाही..!
💚पिंपळाच्या पानात ह्रदयाला शक्ति आणि शांती देण्याची अदभूत क्षमता आहे..!
💚ह्या पिंपळकाढ्याचे
तीन डोस सकाळी 8.00वा., 11.00वा., व 2.00वा. म्हणजे दर तीन तासांनी घ्यावयाचे आहेत....
💙डोस घेण्यापूर्वी
पोट रिकामी असता कामा नये. हलका, पाचक नाश्ता किंवा आहार केल्यानंतरच काढ्याचे डोस घ्यावयाचा आहे.
💜सदरच्या पंधरा दिवसांत तळलेले पदार्थ,भात व्यर्ज आहेत...
तसेच मांस, अंडी, दारु, धुम्रपान पूर्णतः बंद करावीत... मीठ व तेलकट पदार्थ सेवन करू नये...

💖डाळींब, पपई, आवळा, लसूण, मेथी, सफरचंद,मोसंबी, रात्री भिजवलेले काळे चणे, गुगूळ,
मनुका,दही, ताक इ. घ्यावे...

"पिंपळकाढा घेऊन तर बघा..!"भगवंताने पिंपळाचे पान 💚ह्रदयाच्या आकाराचे कां बनविले आहे..?

हे आर्टीकल आपल्या पर्यंत
"Dr. Devendra Sathe" यांनी पाठवले आहे..!!!
🌴 आरोग्य वार्ता🌴
"पाणी पिण्याची योग्य वेळ"

● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर शरीरातील उर्जेला Activateकरतो.

● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -ब्लड प्रेशर त्रास संपवतो.

● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -पचनक्रिया सुधारतो.

● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -हार्ट अटैक पासुन वाचवतो.

जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीत दुखायला लागले, हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंत जाणवत असेल..

तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....

जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करू शकता....

* जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत रहा.

* प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.

* दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांनाअधिकप्रमाणातऑक्सिजनमिळतो.

*अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो..
कृपया जास्तीत जास्त लोकांना हि पोस्ट शेअर करा.
का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात......

महाराष्ट्रातील महत्वाचे RTO पासिंग क्रमांक



*महाराष्ट्रातील महत्त्वाचे R.T.O.क्रमांक जे आपणास माहिती असणे आवश्यक आहे*
RTO Code : MH-01
City Name : Mumbai (South)  RTO is located in Tardeo

RTO Code : MH-02
City Name : Mumbai (West)  RTO is located in Andheri


RTO Code : MH-03
City Name : Mumbai (East)  RTO is located in Wadala

RTO Code : MH-04
City Name : Thane


RTO Code : MH-05
City Name : Kalyan-Dombivali, Ulhasnagar, Ambernath and Badlapur .RTO is located in Kalyan

RTO Code : MH-06
City Name : Raigad ,RTO is located in Pen (does not include Navi Mumbai, Kharghar, Panvel, Khopoli)


RTO Code : MH-07
City Name : Sindhudurg � RTO is located in Sindhudurg Nagari


RTO Code : MH-08
City Name : Ratnagiri


RTO Code : MH-09
City Name : Kolhapur


RTO Code : MH-10
City Name : Sangli

RTO Code : MH-11
City Name : Satara


RTO Code : MH-12
City Name : Pune (city)


RTO Code : MH-13
City Name : Solapur (city)

RTO Code : MH-14
City Name : Pimpri-Chinchwad


RTO Code : MH-15
City Name : Nashik (city)


RTO Code : MH-16
City Name : Ahmednagar

RTO Code : MH-17
City Name : Shrirampur, Ahmednagar District


RTO Code : MH-18
City Name : Dhule


RTO Code : MH-19
City Name : Jalgaon

RTO Code : MH-20
City Name : Aurangabad       RTO is located on Station Road


RTO Code : MH-21
City Name : Jalna (city)


RTO Code : MH-22
City Name : Parbhani


RTO Code : MH-23
City Name : Beed


RTO Code : MH-24
City Name : Latur


RTO Code : MH-25
City Name : Osmanabad


RTO Code : MH-26
City Name : Nanded


RTO Code : MH-27
City Name : Amravati


RTO Code : MH-28
City Name : Buldhana


RTO Code : MH-29
City Name : Yavatmal            RTO is located on Nagpur Road


RTO Code : MH-30
City Name : Akola __RTO is located on Murtizapur Road


RTO Code : MH-31
City Name : Nagpur West - RTO is Located at Amravati Road


RTO Code : MH-32
City Name : Wardha


RTO Code : MH-33
City Name : Gadchiroli


RTO Code : MH-34
City Name : Chandrapur


RTO Code : MH-35
City Name : Gondia


RTO Code : MH-36
City Name : Bhandara


RTO Code : MH-37
City Name : Washim


RTO Code : MH-38
City Name : Hingoli

RTO Code : MH-39
City Name : Nandurbar


RTO Code : MH-40
City Name : Nagpur (Rural)


RTO Code : MH-41
City Name : Malegaon, Nashik District


RTO Code : MH-42
City Name : Baramati, Pune


RTO Code : MH-43
City Name : Navi Mumbai __ RTO at Vashi


RTO Code : MH-44
City Name : Ambejogai, Beed


RTO Code : MH-45
City Name : Akluj, Solapur


RTO Code : MH-46
City Name : Panvel-Khopoli; also MSRTC buses are registered here


RTO Code : MH-47
City Name : Mumbai (North) ___ RTO is located in Kandarpada, Dahisar


RTO Code : MH-48
City Name : Vasai-Virar / Boisar / Palghar / Dahanu

RTO Code : MH-49
City Name : Nagpur East -- RTO is located on Bhandara Road


RTO Code : MH-50
City Name : Karad (Karad Rural) ---RTO is located in Karad


RTO Code : MH-51
City Name : Nashik (Rural)


RTO Code : MH-52
City Name : Reserved for Parbhani (Rural)


RTO Code : MH-53
City Name : Reserved for Pune South


RTO Code : MH-54
City Name : Reserved for Pune North

 सदरची माहिती अत्यंत उपयुक्त असून ती इतरांना पाठवा स्वतः जवळ जपून ठेवा ...
-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-_-


महात्मा ज्योतिबा फुले



      महात्मा जोतिबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

बालपण आणि शिक्षण

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय होता. त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला.. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

सामाजिक कार्य

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईट्‌स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्‍नी सावित्रीबाईंना १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्‍याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्‌र्‍याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

साहित्य आणि लेखन

'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
नाव

साहित्यप्रकार लेखनकाळ
इशारा लेखसंग्रह इ.स. १८८५
गुलामगिरी लेखसंग्रह इ.स. १८७३
तृतीय रत्‍न नाटक इ.स. १८५५
ब्राह्मणांचे कसब लेखसंग्रह इ.स. १८६९
राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा पोवाडा इ.स. १८६९
शेतकर्‍यांचा असूड लेखसंग्रह -- सत्सार नियतकालिक इ.स. १८८५
सार्वजनिक सत्यधर्म लेखसंग्रह इ.स. १८८९

सन्माननीय उपाधी

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.

जीवनपट

Mahatma Phule.jpg
इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
इ.स. १८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.
विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,
त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.
परि स्त्री शिक्षण; हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,
या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. 'शिक्षण व समता' या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.




महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"