"तंत्रज्ञानाची धरूनिया कास,करू विद्यार्थ्यांचा विकास."
Menubar
- होम
- वैशिष्ट्यपूर्ण बाबी
- माझी शाळा
- शालेय प्रकल्प
- स्पर्धा परीक्षा
- आरटीएस(७ वी)
- आमच्याविषयी
- अन्य माहिती
- सहशालेय उपक्रम
- रयत ROSE वेब
- निकाल
- डाउनलोड्स
- संपर्क
Wednesday, January 12, 2022
Sunday, August 15, 2021
इयत्ता १२ वी निकाल वृत्तपत्राने घेतलेली दखल
रयत शिक्षण संस्थेच्या कुरूल येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कला व शास्त्र शाखा इयत्ता 12 वी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
महाराष्ट् राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून 2020-2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षांच्या निकाला मध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शास्त्र शाखेचा निकाल 100% लागला आहे.
शास्त्र शाखेत कु. जाधव आरती तुकाराम हिने 92.16% गुणांसह प्रथम क्रमांक, कु. जाधव सानिका सुधीर 89.66% गुणांसह द्वितीय, चि.ताकभाते अशिष उमेश 88.33% गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे.
कला शाखेचा निकाल 100% लागला आहे.
कला शाखेत कु.भालेकर पूजा अभिमन्यू 76.66% गुणांसह प्रथम क्रमांक , कु. घोडके अश्विनी आण्णासाहेब 69.66% गुणांसह द्वितीय, कु.जाधव वैष्णवी आण्णासाहेब 69.50% गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गणेश गुरव, राजाराम काकडे, नितीन बाबर, रमाकांत क्षीरसागर ,संदीप पाटील, पोपट गुंड,पांडूरंग धेडे, संतोष कुंभार, सौ.प्रफ़ुल्ला कुंभार, मोनिका सुर्वे या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीवकुमार पाटील,विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विलास पाटील, शत्रुघ्न जाधव, लिंगेश्वर निकम, दत्त्तात्रय बोंगे, प्राचार्य आर.एल रेपाळ, पर्यवेक्षक डी. टी. मोहिते,शाळा व्यवस्थापन समिती,विद्या समिती,सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
Thursday, May 13, 2021
प्रवेश प्रक्रिया 2021-22
🌹🌹🌹🌹 प्रवेश प्रक्रिया 2021-22 🌹🌹🌹🌹
🔹🔹🔹 सूचना 🔹🔹🔹कुरुल पंचक्रोशीतील पालक, विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, रयत शिक्षण संस्थेच्या, न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात यापूर्वीच झाली आहे. व्हॉट्स अप द्वारे ऑनलाईन शैक्षणिक कामकाज देखील सुरू झाले आहे. अनेक पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज देखील भरला आहे.
आता वेळ आहे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करण्याची..
आवश्यक कागदपत्रे:
1. शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत)
2. आधार कार्ड (झेरॉक्स)
3. बँक पासबुक (झेरॉक्स)
4. विद्यार्थी संचयिका (इयत्ता 5वी ते 8वी साठी मूळ प्रत)
5. रेशन कार्ड (झेरॉक्स)
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
पूर्वीच्या शाळेतून दाखला आणण्यासाठी दाखला मागणी अर्ज आवश्यक असतो. तो संबंधित पालकांनी शाळेतून दिलेल्या वेळेत घेऊन जावा.
🔹आपली कागदपत्रे प्राप्त होताच आपणास पुस्तकांचा संच दिला जाईल.(इ.5 ते 8)
🔹प्रवेश निश्चित झाल्यावर अजुन आपण संबंधित वर्गाच्या व्हॉटसअप ग्रुप मध्ये नसाल तर इतर वर्गाचे ग्रुप जॉईन करण्यासाठी शाळेत संपर्क साधून आपला व्हॉटसअप नंबर नोंदवू शकता.
🔹 ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर जाऊन माहिती भरावी.
Online Admission Form
हा मेसेज जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावा
मुख्याध्यापक,
न्यू इंग्लिश स्कूल, कूरुल
Saturday, November 14, 2020
स्कॉलरशिप परीक्षेतील जाहीर झालेल्या मेरीट लिस्ट मधील गुणवंत विद्यार्थी
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!*
स्कॉलरशिप परीक्षेतील जाहीर झालेल्या मेरीट लिस्ट मधील गुणवंत विद्यार्थी
( स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी)
1. प्रथमेश धंनजय पाटील.( 8 वी )
2. संस्कार नागेश भालेराव.(8 वी )
3. श्रीयश महेश पवार. (5 वी)
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि सौ. म्हेत्रे एस.पी.(विभागप्रमुख ५ वी), सौ. माने एस्. एम्. (विभागप्रमुख ८ वी), मार्गदर्शक शिक्षक श्री बिराजदार के.एस., श्री खरात एन.आर.,श्री बिराजदार ए.ए.श्री अक्कलकोटे आर.एस्., सौ. सुर्वे पी.ए., सौ डांगे व्ही.एस.,सौ शेटे पी. पी.या सर्वांचे अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विलास काका पाटील, शत्रुघ्न जाधव, लिंगेश्वर निकम, दत्त्तात्रय बोंगे, प्राचार्य डी. टी. मोहिते,शाळा व्यवस्थापन समिती,विद्या समिती,सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
Sunday, October 4, 2020
101 वर्ष रयतेची ..
रयतेची शतकोत्तर वाटचाल...!Thursday, July 30, 2020
SSC Result 2020
Thursday, July 16, 2020
HSC Result 2020
Sunday, June 28, 2020
प्रवेश प्रक्रिया 2020-21
🔹🔹🔹 सूचना 🔹🔹🔹





