Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Sunday, August 15, 2021

इयत्ता १२ वी निकाल वृत्तपत्राने घेतलेली दखल


.कुरूलच्या ज्यु. कॉलेजच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम


रयत शिक्षण संस्थेच्या कुरूल येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कला व शास्त्र शाखा   इयत्ता 12 वी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. 

          महाराष्ट् राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून  2020-2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षांच्या निकाला मध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शास्त्र शाखेचा निकाल 100% लागला आहे. 

शास्त्र शाखेत कु. जाधव आरती तुकाराम हिने 92.16% गुणांसह प्रथम क्रमांक, कु. जाधव सानिका सुधीर 89.66% गुणांसह द्वितीय, चि.ताकभाते अशिष उमेश 88.33% गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे. 

       कला शाखेचा निकाल 100% लागला आहे.

     कला शाखेत कु.भालेकर पूजा अभिमन्यू 76.66% गुणांसह प्रथम क्रमांक , कु. घोडके अश्विनी आण्णासाहेब 69.66% गुणांसह द्वितीय, कु.जाधव वैष्णवी आण्णासाहेब  69.50% गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना  गणेश गुरव, राजाराम काकडे, नितीन बाबर, रमाकांत क्षीरसागर ,संदीप पाटील, पोपट गुंड,पांडूरंग धेडे, संतोष कुंभार, सौ.प्रफ़ुल्ला कुंभार, मोनिका सुर्वे या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे  रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीवकुमार पाटील,विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विलास पाटील, शत्रुघ्न जाधव, लिंगेश्वर निकम, दत्त्तात्रय बोंगे, प्राचार्य आर.एल रेपाळ, पर्यवेक्षक डी. टी. मोहिते,शाळा व्यवस्थापन समिती,विद्या समिती,सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

इयत्ता 11 वी 2021-22 प्रवेश फॉर्म - न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज कुरुल

       
                                Please fill this form directly or click this link -- Click Here For Apply Online

Thursday, May 13, 2021

प्रवेश प्रक्रिया 2021-22

      🌹🌹🌹🌹 प्रवेश प्रक्रिया 2021-22 🌹🌹🌹🌹

                                                 🔹🔹🔹 सूचना 🔹🔹🔹

      कुरुल पंचक्रोशीतील पालक, विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, रयत शिक्षण संस्थेच्या, न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात यापूर्वीच झाली आहे. व्हॉट्स अप द्वारे ऑनलाईन शैक्षणिक कामकाज देखील सुरू झाले आहे. अनेक पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज देखील भरला आहे.

  आता वेळ आहे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करण्याची..

  आवश्यक कागदपत्रे:

1. शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत)

2. आधार कार्ड (झेरॉक्स)

3. बँक पासबुक (झेरॉक्स)

4. विद्यार्थी संचयिका (इयत्ता 5वी ते 8वी साठी मूळ प्रत)

5. रेशन कार्ड (झेरॉक्स)

                                        🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

     पूर्वीच्या शाळेतून दाखला आणण्यासाठी दाखला मागणी अर्ज आवश्यक असतो. तो संबंधित पालकांनी शाळेतून दिलेल्या वेळेत घेऊन जावा.

 🔹आपली कागदपत्रे प्राप्त होताच आपणास पुस्तकांचा संच दिला जाईल.(इ.5 ते 8)

🔹प्रवेश निश्चित झाल्यावर अजुन आपण संबंधित वर्गाच्या व्हॉटसअप ग्रुप मध्ये नसाल तर  इतर वर्गाचे ग्रुप जॉईन करण्यासाठी शाळेत संपर्क साधून  आपला व्हॉटसअप नंबर नोंदवू शकता.

🔹 ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर जाऊन माहिती भरावी.


 Online Admission Form



हा मेसेज जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावा

                  मुख्याध्यापक,

               न्यू इंग्लिश स्कूल, कूरुल

Saturday, November 14, 2020

स्कॉलरशिप परीक्षेतील जाहीर झालेल्या मेरीट लिस्ट मधील गुणवंत विद्यार्थी

 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*अभिनंदन!   अभिनंदन!! अभिनंदन!!!*



स्कॉलरशिप परीक्षेतील जाहीर झालेल्या मेरीट लिस्ट मधील गुणवंत विद्यार्थी


( स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी)


1. प्रथमेश धंनजय पाटील.( 8 वी ) 

2. संस्कार नागेश भालेराव.(8 वी ) 

3. श्रीयश महेश पवार. (5 वी)

                             शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि सौ. म्हेत्रे एस.पी.(विभागप्रमुख ५ वी), सौ. माने एस्. एम्. (विभागप्रमुख ८ वी), मार्गदर्शक शिक्षक श्री बिराजदार के.एस., श्री खरात एन.आर.,श्री बिराजदार ए.ए.श्री अक्कलकोटे आर.एस्., सौ. सुर्वे पी.ए., सौ डांगे व्ही.एस.,सौ शेटे पी. पी.या सर्वांचे अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विलास काका पाटील, शत्रुघ्न जाधव, लिंगेश्वर निकम, दत्त्तात्रय बोंगे, प्राचार्य डी. टी. मोहिते,शाळा व्यवस्थापन समिती,विद्या समिती,सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.




Sunday, October 4, 2020

101 वर्ष रयतेची ..

रयतेची शतकोत्तर वाटचाल...!
    शिवछत्रपतींनी दीनदुबळ्या लोकांसाठी 'रयत' हा शब्द योजला, त्याच शब्दाचा पुनरुच्चार करीत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, तिला आज १०१ वर्षे पूर्ण होत आहेत.देशात कोणतेही शैक्षणिक धोरण नसताना स्वातंत्र्यापुर्वी रयतची स्थापना झाली होती,तदनंतर पन्नास वर्षानी महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली. त्यामुळे देश व राज्य सुसंस्कृत व साक्षर करण्यात रयतचे योगदान असून महाराष्ट्रातील जनता ते कधीच विसरू शकणार नाही..
     लॉर्ड मेकॉलेच्या सिद्धांतानुसार, महाराष्ट्रात  शिक्षण संस्था शहरात सुरू होत असतानाच कर्मवीरांनी 'काले' या ग्रामीण भागात शिक्षण आरंभ करून देशात ग्रामीण क्रांतीची ज्योत पेटवली.
     ७३७ शाखा, पंधरा हजार सेवक व साडेचार लाख विद्यार्थी सध्या रयत मध्ये असून गेल्या शंभर वर्षांपासून हा 'ज्ञानयज्ञ' अव्याहतपणे सुरू आहे. सध्या रयत प्रवाहात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक कोटीहून अधिक लोक असून  न्युझीलंड,ऑस्ट्रिया,स्वीडन या देशांची लोकसंख्या देखील एक कोटीहून कमी आहे,म्हणून रयत ही आशिया खंडात प्रथम क्रमांकाची संस्था मानली जाते.
    सध्या रयतचे वार्षिक बजेट दहा अब्ज पन्नास कोटी रुपये एवढे असून ते मागील काही दिवसांपूर्वी गोवा राज्याच्या बजेटच्या जवळपास होते!
     महाराष्ट्रात रयतने पहिली कृषी शाळा धनिणीच्या बागेत सुरु केलीच, पण आजही १६७२ एकर रयतचे शेतीक्षेत्र आहे, देशातील पहिले महिला डीएड कॉलेज काढून महाराष्ट्रातील मुलींना शिक्षिका करण्याचे महान कार्य रयतनेच केले.देशाच्या स्वातंत्र्यात,गोवा मुक्तिसंग्रामात रयतने मोलाचे योगदान दिले आहे.कर्मवीरांची इच्छा होती की,'रयत विद्यापीठ'व्हावे तिची पूर्तता पूर्ण होत आहे याचा आम्हा सर्वांना अत्यानंद होतोय!!
     आधुनिक शिक्षण देण्याकरिता रयत शिक्षण संस्थेने सहकार्य करार देखील केलेले आहेत.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड,लुपिन लिमिटेड, टाटा बिझनेस सपोर्ट सर्विसेस,द लीडर्स इन इंडस्ट्री, एस एन एस फाउंडेशन, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स, जैन इरिगेशन सिस्टीम, फाली यांसारख्या संस्थांशी रयत शिक्षण संस्थेने सहकार्य करार केलेले आहेत.
        ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आधुनिक शिक्षण तसेच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्था प्रयत्न करीत आहे. कर्मवीर अण्णा नेहमी म्हणत, "जोपर्यंत समाजाला गरज आहे तोपर्यंत माझी रयत समाजाच्या उत्कर्षासाठी काम करेल" ही त्यांची घोषणा खऱ्या अर्थाने त्यांच्या पश्चातही सार्थ ठरत आहे

(संदर्भ - युगप्रवर्तक कर्मवीर पुस्तकातून...)

Thursday, July 30, 2020

SSC Result 2020

न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल ता. मोहोळ जि. सोलापूर 


 इयत्ता १० वी मार्च २०२०  निकाल 

विद्यालायचा निकाल - 99.02% 

103 पैकी 102 उत्तीर्ण

      प्रथम क्रमांक- धैर्यशील नागनाथ जाधव-93.00%

द्वितीय क्रमांक- कु.धनश्री संभाजी धर्मशाळे- 91.40%

तृतीय क्रमांक- कु. वर्षाराणी युवराज चौगुले- 90.60%

चतुर्थ क्रमांक- कु.श्रेया मारुती शिंदे-90.40%

Thursday, July 16, 2020

HSC Result 2020

यशाची उज्वल परंपरा कायम..

न्यु इंग्लिश स्कुल & ज्युनिअर कॉलेज कुरुल


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि सहकारी प्राध्यापकांचे हार्दिक अभिनंदन..!🌷💐


न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु.काॅलेज,कुरुल.🌷बारावी बोर्ड परीक्षा निकाल फेब्रुवारी2020🌷

राज्याचा निकाल - 90.66%

पुणे विभाग निकाल - 92.50%

महाविद्यालयाचा निकाल - 97.87%

कला शाखा - 95.74%

शास्त्र शाखा - 100%

*कला शाखेतून तीन क्रमांक*

1) प्रथम क्रमांक - कु.जाधव पूजा माणिक( 560/650)-  86.15%

2) द्वितीय क्रमांक -कु.जाधव अमृता अनिल (540/650)- 83.07%

3) तृतीय क्रमांक - कु.सलगर कोमल सिद्धेश्वर (538/650)- 82.76%
   
*विज्ञान शाखेतून तीन क्रमांक*

1) प्रथम क्रमांक - कु.पाटील पूजा दिलीप (550/650) - 84.61%

2) द्वितीय क्रमांक - कु.क्षीरसागर रेवती शिवाजी (523/650)- 80.46%

3) तृतीय क्रमांक -कु.जाधव सायली सुधीर(513/650)- 78.92%

Sunday, June 28, 2020

प्रवेश प्रक्रिया 2020-21

                                                    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
                                                 🔹🔹🔹 सूचना 🔹🔹🔹

      कुरुल पंचक्रोशीतील पालक, विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, रयत शिक्षण संस्थेच्या, न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात यापूर्वीच झाली आहे. व्हॉट्स अप द्वारे ऑनलाईन शैक्षणिक कामकाज देखील सुरू झाले आहे. अनेक पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज देखील भरला आहे.

  आता वेळ आहे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करण्याची..

  आवश्यक कागदपत्रे:

1. शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत)

2. आधार कार्ड (झेरॉक्स)

3. बँक पासबुक (झेरॉक्स)

4. विद्यार्थी संचयिका (इयत्ता 5वी ते 8वी साठी मूळ प्रत)

5. रेशन कार्ड (झेरॉक्स)

                                        🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

     पूर्वीच्या शाळेतून दाखला आणण्यासाठी दाखला मागणी अर्ज आवश्यक असतो. तो संबंधित पालकांनी शाळेतून दिलेल्या वेळेत घेऊन जावा.

 🔹आपली कागदपत्रे प्राप्त होताच आपणास पुस्तकांचा संच दिला जाईल.(इ.5 ते 8)

🔹 ₹2000/- रुपये बाजारमूल्य असलेले नवनीत टॉप स्कोरर ऍप मोफत मिळेल.

🔹प्रवेश निश्चित झाल्यावर अजुन आपण संबंधित वर्गाच्या व्हॉटसअप ग्रुप मध्ये नसाल तर  इतर वर्गाचे ग्रुप जॉईन करण्यासाठी शाळेत संपर्क साधून  आपला व्हॉटसअप नंबर नोंदवू शकता.

🔹 ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर जाऊन माहिती भरावी.


 Online Admission Form


🌹🌹 प्रवेश निश्चित करण्यासाठी व दाखला मागणी नेण्यासाठी खालील वेळेत शाळेत उपस्थित राहावे. 🌹🌹

🔹 वेळ:

सोमवार ते शनिवार - सकाळी 9.00 ते दुपारी 12.00

हा मेसेज जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावा

                  मुख्याध्यापक,

               न्यू इंग्लिश स्कूल, कूरुल

Friday, May 8, 2020

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!



ज्ञानगंगेचा भगीरथ...

             पुराणामध्ये भगीरथाची गोष्ट सांगितली जाते. पूर्वजांच्या उद्धारासाठी चौदा वर्षे तपश्चर्या करून स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली म्हणे त्याने... पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित असलेल्या तळागाळातील गोरगरीब बहुजनांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाची गंगा पोहचवण्याचे थोर कार्य आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे तब्बल चाळीस वर्षे बहुजन उद्धाराचे महत्कार्य करणाऱ्या आधुनिक भगीरथाचे उदाहरण मात्र आपल्यासमोर आहे. असा हा रयतेचा अजिंक्यतारा म्हणजे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील.

             घरी आलेल्या पाहुण्यांच्या समोर "मुलगा फक्त दोन वेळचे खातो आणि गावभर फिरतो," हा वडिलांनी केलेला अपमान तोंडातल्या घासाबरोबर गिळला असला; तरी मानी पत्नीच्या डोळ्यांतून ओघळलेल्या दोन थेंबांनी मात्र भाऊरावांना आतून बाहेरून हलवून टाकले. घरातून बाहेर पडून ते सातारला येऊन शिकवणी घेऊ लागले. तेथून ते पाटील मास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले.

            वर्गाच्या बाहेर बसून शिकणाऱ्या ज्ञानदेव घोलप नावाच्या दलित विद्यार्थ्याला तडक खांद्यावर घेऊन त्याच्या शिक्षणाची व्यवस्था लावून देणाऱ्या भाऊरावांनी प्रचलित समाजव्यवस्थेविरूद्ध बंडाचा झेंडा हाती घेतला. सत्यशोधक विचारांच्या मुशीत तयार झालेल्या भाऊरावांपुढे महात्मा ज्योतिराव फुले आणि राजर्षि शाहू महाराजांचा आदर्श होता. प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या सहवासात शिक्षणाचे नवे स्वप्न आकाराला येऊ लागले.

             काही मित्रांच्या सोबतीने उभी केलेली दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळी ही रयत शिक्षण संस्थेची पायाभरणीच होती. वेगवेगळ्या समाजातील मुलांसाठी एकच वसतिगृह हा क्रांतिकारक निर्णय होता. वेगवेगळ्या जातिधर्माची मुले एकाच छताखाली येऊन शिकू लागली. सातारच्या धनिणीच्या बागेत उभे राहिलेले शाहू बोर्डिंग हे क्रांतिकारक स्मारक आहे. तोपर्यंत गरीबाघरची मुले माधुकरी मागून शिकत होती. पण अण्णांच्या स्वाभिमानी मनाला हे पटणारे नव्हते. स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कमवा आणि शिका या ब्रीदाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मन, मनगट आणि मेंदूचा विकास केला. हातावर असलेला घट्टा ही खर्‍या विद्यार्थ्यांची खूण होती. काले या ठिकाणी काढलेली पहिली शाळा म्हणजे अण्णांनी लावलेले इवलेसे रोपटे होते. आपल्याजवळ असले नसलेले सर्व काही अण्णांनी या मुलांसाठी अर्पण केले. अंगावर वजनाइतके सोने घेऊन आलेल्या पत्नीलाही लंकेची पार्वती करून टाकले. या गोरगरिबांच्या पोरांसाठी खांद्याला झोळी अडकवून गावोगाव फिरून मदत गोळा केली. एक मूठ धान्य आणि एक रुपया अशी थेंबाथेंबाने मदत गोळा करताना त्यांनी पायातली पायताणं झिजवली. आज तेच इवलेसे झाड महावृक्ष झाले आहे. वडाच्या झाडाची एक गंमत असते. त्याची पारंबी जिथे जमिनीला टेकते; तिथे नवीन झाड तयार होते. आज अण्णांनी लावलेल्या एका फांदीपासून मोठा वटवृक्ष उभा राहिला.

संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अगदी महात्मा गांधीनीही अण्णांच्या या कामाची दखल घेतलेली होती. "साबरमतीमध्ये जे मी करू शकलो नाही, ते भाऊरावांनी येथे करून दाखवले." अशी पोचपावतीच त्यांना मिळाली.
            आज 438 माध्यमिक, 42 महाविद्यालये, 51 प्राथमिक, 33 पूर्वप्राथमिक, 7 अध्यापक विद्यालये, 91 वसतिगृहे, 8 आश्रमशाळा, 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 1 रयत इन्स्टिट्युट आॕफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट, 57 इतर शाखा, 17 शेतीशाळा, 7 प्रशासकीय कार्यालये, 1 बँक अशा पाच विभागात पंधरा जिल्ह्यात पसरलेल्या या वटवृक्षाच्या एकूण 737 पारंब्या असून 4,58,044 विद्यार्थी आणि 16172 सेवकवर्ग असा पसारा घेऊन अण्णांनी लावलेला हा वटवृक्ष महाराष्ट्रातील नव्हे, देशातील नव्हे; तर आशिया खंडातील सर्वांत मोठी व अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून शंभरी पूर्ण करत आहे. Quantity कडून Qualityकडे आज होत असलेली वाटचाल पाहता कोणत्याही सामन्यातील कोणत्याही खेळाडूने ठोकलेल्या शतकापेक्षा आज संस्थेने केलेली शतक महोत्सवी वाटचाल ही कित्येक पटीने श्रेष्ठ आहे. फक्त आता आपली सर्वांचीच अगदी सेवकांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत अगदी सर्वांचीच जबाबदारी आहे की, त्यागातून उभारलेल्या या वटवृक्षाला तेवढ्याच सात्त्विकपणे व स्वच्छपणे जपले पाहिजे.

           आज या वडाचे एक पान म्हणून एक सेवक म्हणून मला अभिमान आहे. या वडाचीच एक पारंबी असलेल्या न्यू इंग्लिश स्कुल कुरुलच्या वतीने या वटवृक्षाला व त्याच्या जन्मदात्या शिक्षणमहर्षि कर्मवीर अण्णांना त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन...!!!

Monday, April 27, 2020

ऑनलाईन चाचणी क्र.५ :- इयत्ता ७ वी - नागरिकशास्त्र

*STUDY FROM HOME*

ऑनलाईन चाचणी क्र.५ :-  इयत्ता ७ वी - नागरिकशास्त्र 

२) संविधानाची उद्देशिका 



चाचणी सोडविण्यासाठी  खालील चित्रावर टच / क्लिक करा.





                                          चाचणी बाबत काही सूचना :

    वर तुम्हाला एक लिंक दिली आहे. तुमच्या वेळेनुसार  लिंक ओपन करून  बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत.

     त्यामध्ये सुरवातीला 

     विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव , गाव, मोबाईल नंबर,  टाकून

    Submit बटनावर टच/क्लिक केल्यास प्रत्यक्ष प्रश्नापर्यंत जाता येते.

     प्रश्न नीट वाचून चारपैकी  कोणताही एक योग्य पर्याय निवडावा लागेल.

     सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर सबमिट (Submit) बटनवर क्लिक करावे लागेल.

नंतर VIEW SCORE वर क्लिक केल्यावर तुम्ही सोडविलेले प्रश्न, चूक व बरोबर उत्तरे व गुण दिसतील.



*श्री.  खरात व्ही डी.(सह.शिक्षक),*

न्यू इंग्लिश स्कूलकुरुल

*STAY HOME STAY SAFE*

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"