Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Saturday, January 12, 2019

महात्मा फुलेंचा संपूर्ण जीवनपट

अ.क्र.
दिनांक / महिना
इ.स.
घटना
१.
एप्रिल ११
इ.स.१८२७
जन्म [पुणे].
२.
इ.स. १८३४ ते १८३८
पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.
३.
इ.स. १८४०
नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी विवाह.
४.
इ.स. १८४१ ते १८४७
मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण.
५.
इ.स. १८४७
लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार.
६.
इ.स. १८४७
टॉमस पेन कृत राईट ऑफ मॅनया ग्रंथाचे मनन.
इ.स. १८४८
उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान .
८.
इ.स.१८४८
शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.
इ.स. १८४९
शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्‍नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग.
१०
इ.स. १८४९
मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणार्‍या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.
११
इ.स. १८५१
चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.
१२
नोव्हेंबर १६
इ.स.१८५२
मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
१३
इ.स. १८४७
थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
१४
इ.स. १८४८
मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
१५
इ.स.१८४८
भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
१६
सप्टेंबर ७
इ.स.१८५१
भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
१७
इ.स.१८५२
१८
मार्च १५
इ.स.१८५२
वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१९
नोव्हेंबर १६
इ.स.१८५२
मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
२०
इ.स.१८५३
२१
इ.स.१८५४
स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी.
२२
इ.स.१८५५
रात्रशाळेची सुरुवात केली.
२३
इ.स.१८५६
जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्‍न झाला.
२४
इ.स.१८५८
शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
२५
इ.स.१८६०
विधवाविवाहास साहाय्य केले.
२६
इ.स.१८६३
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
२७
इ.स.१८६५
विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
२८
इ.स.१८६४
गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
२९
इ.स.१८६८
दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
३०
इ.स.१८७३
सत्यशोधक समाजची स्थापना केली.
३१
इ.स.१८७५
शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
३२
इ.स. १८७५
स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
३३
इ.स. १८७६ ते १८८२
पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
३४
इ.स. १८८०
दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
३५
इ.स.१८८०
नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
३६
इ.स.१८८२
'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
३७
इ.स.१८८७
सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
३८
इ.स.१८८८
ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
३९
११ मे
इ.स.१८८८
मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.
४०
नोव्हेंबर २८
इ.स.१८९०
पुणे येथे निधन.

Friday, December 21, 2018

आठवडी बाजार आयोजन


खुश खबर ! खुश खबर !! खुश खबर !!!

 रयत शिक्षण संस्थेचे,
न्यु इंग्लिश स्कुल माध्य व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय कुरुल ता.मोहळ जि.सोलापुर.



         @@ आठवडी बाजार  @@



या विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दि.24/12/2018 वार सोमवार रोजी सकाळी ठिक 9 ते 12 या वेळेत विद्यार्थी आठवडी बाजार भरणार आहे.

या बाजारात विविध प्रकारचा भाजीपाला,जनरल स्टोअर्स,किराणा,हाॅटेल्स,खेळणी असे विविध प्रकारचे स्टाॅल्स उभारले जाणार आहेत.
तरी कुरुल व पंचक्राेशीतील सर्व बंधु-भगिनींना कोणत्याही प्रकारचा बाजार करण्यासाठी बाहेर गावी जावे लागणार नाही.सर्व प्रकारचा आठवडी बाजार आज आपल्या 
विद्यालयात विद्यार्थ्याचे व्यवहारीक /व्यवसायीक ज्ञान वृद्धीगत करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे.

तरी सर्व सुजाण कुरुल व कुरुल पंचक्रोशीतील बंधु-भगिनींना विनंती आहे की आपण या बाजारात येऊन खरेदी करुन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करावा ही विनंती.
*==================*
    कळावे,   
   मा.मुख्याध्यापक
   श्री.पिसे एस. के.
*==================*

Sunday, December 3, 2017

आबांना भावपूर्ण श्रध्दांजली ।

  मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते , सहकार महर्षी शंकरराव मोहितेपाटील  यांचे खंदे समर्थक , लोकनेते कै . बाबुराव आण्णा पाटील व शहाजीराव पाटील यांचे सहकारी कुरुलचे ज्येष्ठनागरिक , भीमा सहकारी साखरकारखान्याचे माजी संचालक,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मारुती आबा आनंदराव  पाटील यांचे आज रविवारी सकाळी ७.३० वाजता ह्रदयविकाराचा  अटॅक येऊन सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दुःखद निधन झाले  आहे .

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"