Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Saturday, November 14, 2020

स्कॉलरशिप परीक्षेतील जाहीर झालेल्या मेरीट लिस्ट मधील गुणवंत विद्यार्थी

 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

*अभिनंदन!   अभिनंदन!! अभिनंदन!!!*



स्कॉलरशिप परीक्षेतील जाहीर झालेल्या मेरीट लिस्ट मधील गुणवंत विद्यार्थी


( स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी)


1. प्रथमेश धंनजय पाटील.( 8 वी ) 

2. संस्कार नागेश भालेराव.(8 वी ) 

3. श्रीयश महेश पवार. (5 वी)

                             शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आणि सौ. म्हेत्रे एस.पी.(विभागप्रमुख ५ वी), सौ. माने एस्. एम्. (विभागप्रमुख ८ वी), मार्गदर्शक शिक्षक श्री बिराजदार के.एस., श्री खरात एन.आर.,श्री बिराजदार ए.ए.श्री अक्कलकोटे आर.एस्., सौ. सुर्वे पी.ए., सौ डांगे व्ही.एस.,सौ शेटे पी. पी.या सर्वांचे अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विलास काका पाटील, शत्रुघ्न जाधव, लिंगेश्वर निकम, दत्त्तात्रय बोंगे, प्राचार्य डी. टी. मोहिते,शाळा व्यवस्थापन समिती,विद्या समिती,सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.




Sunday, October 4, 2020

101 वर्ष रयतेची ..

रयतेची शतकोत्तर वाटचाल...!
    शिवछत्रपतींनी दीनदुबळ्या लोकांसाठी 'रयत' हा शब्द योजला, त्याच शब्दाचा पुनरुच्चार करीत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, तिला आज १०१ वर्षे पूर्ण होत आहेत.देशात कोणतेही शैक्षणिक धोरण नसताना स्वातंत्र्यापुर्वी रयतची स्थापना झाली होती,तदनंतर पन्नास वर्षानी महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली. त्यामुळे देश व राज्य सुसंस्कृत व साक्षर करण्यात रयतचे योगदान असून महाराष्ट्रातील जनता ते कधीच विसरू शकणार नाही..
     लॉर्ड मेकॉलेच्या सिद्धांतानुसार, महाराष्ट्रात  शिक्षण संस्था शहरात सुरू होत असतानाच कर्मवीरांनी 'काले' या ग्रामीण भागात शिक्षण आरंभ करून देशात ग्रामीण क्रांतीची ज्योत पेटवली.
     ७३७ शाखा, पंधरा हजार सेवक व साडेचार लाख विद्यार्थी सध्या रयत मध्ये असून गेल्या शंभर वर्षांपासून हा 'ज्ञानयज्ञ' अव्याहतपणे सुरू आहे. सध्या रयत प्रवाहात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक कोटीहून अधिक लोक असून  न्युझीलंड,ऑस्ट्रिया,स्वीडन या देशांची लोकसंख्या देखील एक कोटीहून कमी आहे,म्हणून रयत ही आशिया खंडात प्रथम क्रमांकाची संस्था मानली जाते.
    सध्या रयतचे वार्षिक बजेट दहा अब्ज पन्नास कोटी रुपये एवढे असून ते मागील काही दिवसांपूर्वी गोवा राज्याच्या बजेटच्या जवळपास होते!
     महाराष्ट्रात रयतने पहिली कृषी शाळा धनिणीच्या बागेत सुरु केलीच, पण आजही १६७२ एकर रयतचे शेतीक्षेत्र आहे, देशातील पहिले महिला डीएड कॉलेज काढून महाराष्ट्रातील मुलींना शिक्षिका करण्याचे महान कार्य रयतनेच केले.देशाच्या स्वातंत्र्यात,गोवा मुक्तिसंग्रामात रयतने मोलाचे योगदान दिले आहे.कर्मवीरांची इच्छा होती की,'रयत विद्यापीठ'व्हावे तिची पूर्तता पूर्ण होत आहे याचा आम्हा सर्वांना अत्यानंद होतोय!!
     आधुनिक शिक्षण देण्याकरिता रयत शिक्षण संस्थेने सहकार्य करार देखील केलेले आहेत.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड,लुपिन लिमिटेड, टाटा बिझनेस सपोर्ट सर्विसेस,द लीडर्स इन इंडस्ट्री, एस एन एस फाउंडेशन, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स, जैन इरिगेशन सिस्टीम, फाली यांसारख्या संस्थांशी रयत शिक्षण संस्थेने सहकार्य करार केलेले आहेत.
        ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आधुनिक शिक्षण तसेच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्था प्रयत्न करीत आहे. कर्मवीर अण्णा नेहमी म्हणत, "जोपर्यंत समाजाला गरज आहे तोपर्यंत माझी रयत समाजाच्या उत्कर्षासाठी काम करेल" ही त्यांची घोषणा खऱ्या अर्थाने त्यांच्या पश्चातही सार्थ ठरत आहे

(संदर्भ - युगप्रवर्तक कर्मवीर पुस्तकातून...)

Thursday, July 30, 2020

SSC Result 2020

न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल ता. मोहोळ जि. सोलापूर 


 इयत्ता १० वी मार्च २०२०  निकाल 

विद्यालायचा निकाल - 99.02% 

103 पैकी 102 उत्तीर्ण

      प्रथम क्रमांक- धैर्यशील नागनाथ जाधव-93.00%

द्वितीय क्रमांक- कु.धनश्री संभाजी धर्मशाळे- 91.40%

तृतीय क्रमांक- कु. वर्षाराणी युवराज चौगुले- 90.60%

चतुर्थ क्रमांक- कु.श्रेया मारुती शिंदे-90.40%

Thursday, July 16, 2020

HSC Result 2020

यशाची उज्वल परंपरा कायम..

न्यु इंग्लिश स्कुल & ज्युनिअर कॉलेज कुरुल


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि सहकारी प्राध्यापकांचे हार्दिक अभिनंदन..!🌷💐


न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु.काॅलेज,कुरुल.🌷बारावी बोर्ड परीक्षा निकाल फेब्रुवारी2020🌷

राज्याचा निकाल - 90.66%

पुणे विभाग निकाल - 92.50%

महाविद्यालयाचा निकाल - 97.87%

कला शाखा - 95.74%

शास्त्र शाखा - 100%

*कला शाखेतून तीन क्रमांक*

1) प्रथम क्रमांक - कु.जाधव पूजा माणिक( 560/650)-  86.15%

2) द्वितीय क्रमांक -कु.जाधव अमृता अनिल (540/650)- 83.07%

3) तृतीय क्रमांक - कु.सलगर कोमल सिद्धेश्वर (538/650)- 82.76%
   
*विज्ञान शाखेतून तीन क्रमांक*

1) प्रथम क्रमांक - कु.पाटील पूजा दिलीप (550/650) - 84.61%

2) द्वितीय क्रमांक - कु.क्षीरसागर रेवती शिवाजी (523/650)- 80.46%

3) तृतीय क्रमांक -कु.जाधव सायली सुधीर(513/650)- 78.92%

Sunday, June 28, 2020

प्रवेश प्रक्रिया 2020-21

                                                    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
                                                 🔹🔹🔹 सूचना 🔹🔹🔹

      कुरुल पंचक्रोशीतील पालक, विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, रयत शिक्षण संस्थेच्या, न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात यापूर्वीच झाली आहे. व्हॉट्स अप द्वारे ऑनलाईन शैक्षणिक कामकाज देखील सुरू झाले आहे. अनेक पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज देखील भरला आहे.

  आता वेळ आहे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करण्याची..

  आवश्यक कागदपत्रे:

1. शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत)

2. आधार कार्ड (झेरॉक्स)

3. बँक पासबुक (झेरॉक्स)

4. विद्यार्थी संचयिका (इयत्ता 5वी ते 8वी साठी मूळ प्रत)

5. रेशन कार्ड (झेरॉक्स)

                                        🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

     पूर्वीच्या शाळेतून दाखला आणण्यासाठी दाखला मागणी अर्ज आवश्यक असतो. तो संबंधित पालकांनी शाळेतून दिलेल्या वेळेत घेऊन जावा.

 🔹आपली कागदपत्रे प्राप्त होताच आपणास पुस्तकांचा संच दिला जाईल.(इ.5 ते 8)

🔹 ₹2000/- रुपये बाजारमूल्य असलेले नवनीत टॉप स्कोरर ऍप मोफत मिळेल.

🔹प्रवेश निश्चित झाल्यावर अजुन आपण संबंधित वर्गाच्या व्हॉटसअप ग्रुप मध्ये नसाल तर  इतर वर्गाचे ग्रुप जॉईन करण्यासाठी शाळेत संपर्क साधून  आपला व्हॉटसअप नंबर नोंदवू शकता.

🔹 ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर जाऊन माहिती भरावी.


 Online Admission Form


🌹🌹 प्रवेश निश्चित करण्यासाठी व दाखला मागणी नेण्यासाठी खालील वेळेत शाळेत उपस्थित राहावे. 🌹🌹

🔹 वेळ:

सोमवार ते शनिवार - सकाळी 9.00 ते दुपारी 12.00

हा मेसेज जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावा

                  मुख्याध्यापक,

               न्यू इंग्लिश स्कूल, कूरुल

Friday, May 8, 2020

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!



ज्ञानगंगेचा भगीरथ...

             पुराणामध्ये भगीरथाची गोष्ट सांगितली जाते. पूर्वजांच्या उद्धारासाठी चौदा वर्षे तपश्चर्या करून स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली म्हणे त्याने... पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित असलेल्या तळागाळातील गोरगरीब बहुजनांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाची गंगा पोहचवण्याचे थोर कार्य आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे तब्बल चाळीस वर्षे बहुजन उद्धाराचे महत्कार्य करणाऱ्या आधुनिक भगीरथाचे उदाहरण मात्र आपल्यासमोर आहे. असा हा रयतेचा अजिंक्यतारा म्हणजे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील.

             घरी आलेल्या पाहुण्यांच्या समोर "मुलगा फक्त दोन वेळचे खातो आणि गावभर फिरतो," हा वडिलांनी केलेला अपमान तोंडातल्या घासाबरोबर गिळला असला; तरी मानी पत्नीच्या डोळ्यांतून ओघळलेल्या दोन थेंबांनी मात्र भाऊरावांना आतून बाहेरून हलवून टाकले. घरातून बाहेर पडून ते सातारला येऊन शिकवणी घेऊ लागले. तेथून ते पाटील मास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले.

            वर्गाच्या बाहेर बसून शिकणाऱ्या ज्ञानदेव घोलप नावाच्या दलित विद्यार्थ्याला तडक खांद्यावर घेऊन त्याच्या शिक्षणाची व्यवस्था लावून देणाऱ्या भाऊरावांनी प्रचलित समाजव्यवस्थेविरूद्ध बंडाचा झेंडा हाती घेतला. सत्यशोधक विचारांच्या मुशीत तयार झालेल्या भाऊरावांपुढे महात्मा ज्योतिराव फुले आणि राजर्षि शाहू महाराजांचा आदर्श होता. प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या सहवासात शिक्षणाचे नवे स्वप्न आकाराला येऊ लागले.

             काही मित्रांच्या सोबतीने उभी केलेली दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळी ही रयत शिक्षण संस्थेची पायाभरणीच होती. वेगवेगळ्या समाजातील मुलांसाठी एकच वसतिगृह हा क्रांतिकारक निर्णय होता. वेगवेगळ्या जातिधर्माची मुले एकाच छताखाली येऊन शिकू लागली. सातारच्या धनिणीच्या बागेत उभे राहिलेले शाहू बोर्डिंग हे क्रांतिकारक स्मारक आहे. तोपर्यंत गरीबाघरची मुले माधुकरी मागून शिकत होती. पण अण्णांच्या स्वाभिमानी मनाला हे पटणारे नव्हते. स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कमवा आणि शिका या ब्रीदाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मन, मनगट आणि मेंदूचा विकास केला. हातावर असलेला घट्टा ही खर्‍या विद्यार्थ्यांची खूण होती. काले या ठिकाणी काढलेली पहिली शाळा म्हणजे अण्णांनी लावलेले इवलेसे रोपटे होते. आपल्याजवळ असले नसलेले सर्व काही अण्णांनी या मुलांसाठी अर्पण केले. अंगावर वजनाइतके सोने घेऊन आलेल्या पत्नीलाही लंकेची पार्वती करून टाकले. या गोरगरिबांच्या पोरांसाठी खांद्याला झोळी अडकवून गावोगाव फिरून मदत गोळा केली. एक मूठ धान्य आणि एक रुपया अशी थेंबाथेंबाने मदत गोळा करताना त्यांनी पायातली पायताणं झिजवली. आज तेच इवलेसे झाड महावृक्ष झाले आहे. वडाच्या झाडाची एक गंमत असते. त्याची पारंबी जिथे जमिनीला टेकते; तिथे नवीन झाड तयार होते. आज अण्णांनी लावलेल्या एका फांदीपासून मोठा वटवृक्ष उभा राहिला.

संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अगदी महात्मा गांधीनीही अण्णांच्या या कामाची दखल घेतलेली होती. "साबरमतीमध्ये जे मी करू शकलो नाही, ते भाऊरावांनी येथे करून दाखवले." अशी पोचपावतीच त्यांना मिळाली.
            आज 438 माध्यमिक, 42 महाविद्यालये, 51 प्राथमिक, 33 पूर्वप्राथमिक, 7 अध्यापक विद्यालये, 91 वसतिगृहे, 8 आश्रमशाळा, 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 1 रयत इन्स्टिट्युट आॕफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट, 57 इतर शाखा, 17 शेतीशाळा, 7 प्रशासकीय कार्यालये, 1 बँक अशा पाच विभागात पंधरा जिल्ह्यात पसरलेल्या या वटवृक्षाच्या एकूण 737 पारंब्या असून 4,58,044 विद्यार्थी आणि 16172 सेवकवर्ग असा पसारा घेऊन अण्णांनी लावलेला हा वटवृक्ष महाराष्ट्रातील नव्हे, देशातील नव्हे; तर आशिया खंडातील सर्वांत मोठी व अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून शंभरी पूर्ण करत आहे. Quantity कडून Qualityकडे आज होत असलेली वाटचाल पाहता कोणत्याही सामन्यातील कोणत्याही खेळाडूने ठोकलेल्या शतकापेक्षा आज संस्थेने केलेली शतक महोत्सवी वाटचाल ही कित्येक पटीने श्रेष्ठ आहे. फक्त आता आपली सर्वांचीच अगदी सेवकांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत अगदी सर्वांचीच जबाबदारी आहे की, त्यागातून उभारलेल्या या वटवृक्षाला तेवढ्याच सात्त्विकपणे व स्वच्छपणे जपले पाहिजे.

           आज या वडाचे एक पान म्हणून एक सेवक म्हणून मला अभिमान आहे. या वडाचीच एक पारंबी असलेल्या न्यू इंग्लिश स्कुल कुरुलच्या वतीने या वटवृक्षाला व त्याच्या जन्मदात्या शिक्षणमहर्षि कर्मवीर अण्णांना त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन...!!!

Monday, April 27, 2020

ऑनलाईन चाचणी क्र.५ :- इयत्ता ७ वी - नागरिकशास्त्र

*STUDY FROM HOME*

ऑनलाईन चाचणी क्र.५ :-  इयत्ता ७ वी - नागरिकशास्त्र 

२) संविधानाची उद्देशिका 



चाचणी सोडविण्यासाठी  खालील चित्रावर टच / क्लिक करा.





                                          चाचणी बाबत काही सूचना :

    वर तुम्हाला एक लिंक दिली आहे. तुमच्या वेळेनुसार  लिंक ओपन करून  बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत.

     त्यामध्ये सुरवातीला 

     विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव , गाव, मोबाईल नंबर,  टाकून

    Submit बटनावर टच/क्लिक केल्यास प्रत्यक्ष प्रश्नापर्यंत जाता येते.

     प्रश्न नीट वाचून चारपैकी  कोणताही एक योग्य पर्याय निवडावा लागेल.

     सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर सबमिट (Submit) बटनवर क्लिक करावे लागेल.

नंतर VIEW SCORE वर क्लिक केल्यावर तुम्ही सोडविलेले प्रश्न, चूक व बरोबर उत्तरे व गुण दिसतील.



*श्री.  खरात व्ही डी.(सह.शिक्षक),*

न्यू इंग्लिश स्कूलकुरुल

*STAY HOME STAY SAFE*

Thursday, April 23, 2020

ऑनलाईन चाचणी क्र.४ :- इयत्ता ७ वी - इतिहास


*STUDY FROM HOME*

ऑनलाईन चाचणी क्र.४ :-  इयत्ता ७ वी - इतिहास 

२) शिवपूर्वकालीन भारत 



चाचणी सोडविण्यासाठी  खालील चित्रावर टच / क्लिक करा.





चाचणी बाबत काही सूचना :

वर तुम्हाला एक लिंक दिली आहे. तुमच्या वेळेनुसार  लिंक ओपन करून  बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत.

त्यामध्ये सुरवातीला 

ईमेल आयडी, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव , गाव, मोबाईल नंबर,  टाकून Submit बटनावर टच/क्लिक केल्यास प्रत्यक्ष प्रश्नापर्यंत जाता येते.

इमेल आय डी बरोबर टाकला तर सायंकाळी निकाल आपल्या इमेल वर मिळेल.

नंतर प्रश्न नीट वाचून चारपैकी  कोणताही एक योग्य पर्याय निवडावा लागेल.

सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर सबमिट बटनवर क्लिक करायचे.

नंतर VIEW SCORE वर क्लिक केल्यावर तुम्ही सोडविलेले प्रश्न, चूक व बरोबर उत्तरे व गुण दिसतील.



*श्री.  खरात व्ही डी.(सह.शिक्षक),*

न्यू इंग्लिश स्कूलकुरुल

*STAY HOME STAY SAFE*

Monday, April 20, 2020

NES Kurul Drone Shoot







ऑनलाईन चाचणी क्र.३ : इयत्ता ७ वी - भूगोल



*STUDY FROM HOME*

ऑनलाईन चाचणी क्र.३ :-  इयत्ता ७ वी - भूगोल 

१) ऋतुनिर्मिती भाग -१ 
२) सूर्य,चंद्र व पृथ्वी 



चाचणी सोडविण्यासाठी  खालील चित्रावर टच / क्लिक करा.







चाचणी बाबत काही सूचना :

वर तुम्हाला एक लिंक दिली आहे. तुमच्या वेळेनुसार  लिंक ओपन करून  बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत.

त्यामध्ये सुरवातीला 

ईमेल आयडी, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव , गाव, मोबाईल नंबर,  टाकून Submit बटनावर टच/क्लिक केल्यास प्रत्यक्ष प्रश्नापर्यंत जाता येते.

इमेल आय डी बरोबर टाकला तर सायंकाळी निकाल आपल्या इमेल वर मिळेल.

नंतर प्रश्न नीट वाचून चारपैकी  कोणताही एक योग्य पर्याय निवडावा लागेल.

सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर सबमिट बटनवर क्लिक करायचे.

नंतर VIEW SCORE वर क्लिक केल्यावर तुम्ही सोडविलेले प्रश्न, चूक व बरोबर उत्तरे व गुण दिसतील.




*श्री.  खरात व्ही डी.(सह.शिक्षक),*

न्यू इंग्लिश स्कूलकुरुल

*STAY HOME STAY SAFE*

Thursday, April 16, 2020

चाचणी २ - आपल्या संविधांची ओळख



*STUDY FROM HOME*

ऑनलाईन चाचणी क्र.२ :- नागरिकशास्त्र प्रकरण १- आपल्या संविधांची ओळख 



चाचणी सोडविण्यासाठी  खालील चित्रावर टच / क्लिक करा.





चाचणी बाबत काही सूचना :

वर तुम्हाला एक लिंक दिली आहे. तुमच्या वेळेनुसार  लिंक ओपन करून  बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत.

त्यामध्ये सुरवातीला 

ईमेल आयडी, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव , गाव, मोबाईल नंबर,  टाकून Submit बटनावर टच/क्लिक केल्यास प्रत्यक्ष प्रश्नापर्यंत जाता येते.

इमेल आय डी बरोबर टाकला तर सायंकाळी निकाल आपल्या इमेल वर मिळेल.

नंतर प्रश्न नीट वाचून चारपैकी  कोणताही एक योग्य पर्याय निवडावा लागेल.

सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर सबमिट बटनवर क्लिक करायचे.

नंतर VIEW SCORE वर क्लिक केल्यावर तुम्ही सोडविलेले प्रश्न, चूक व बरोबर उत्तरे व गुण दिसतील.




*श्री.  खरात व्ही डी.(सह.शिक्षक),*

न्यू इंग्लिश स्कूलकुरुल

*STAY HOME STAY SAFE*


निकाल 


       काल दिनांक १६/०४/२०२० रोजी झालेल्या ऑनलाईन चाचणी क्रमांक २ मध्ये विद्यालयातील एकूण १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 
       आपल्याप्रमाणेच इतर शाळाच्या विद्यार्थ्यांनीही चाचणी सोडविली आहे त्यांची संख्या ४४ आहे. 
       सर्वांचा एकत्र निकाल पाहण्यासाठी काल चाचणी सोडविलेल्या ब्लॉगवर उपलब्ध करून दिला आहे. 

               सर्व सहभागी विद्यार्थी व त्यांना मदत करणारे पालक यांचे हार्दिक अभिनंदन !!!


निकाल पाहण्यासाठी या चित्रावर टच/ क्लिक करा.

निकाल पाहण्यासाठी या चित्रावर टच/ क्लिक करा.












Monday, April 13, 2020

STUDY FROM HOME - Online Tests


*STUDY FROM HOME*

   विद्यार्थी मित्रांनो *स्टडी फ्रॉम होम* या उपक्रमातील स्वभ्यास व ऑनलाइन टेस्ट या उपक्रमाला आपण 

चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले आभार. पहिल्या सदरात ज्या विद्यार्थी मित्रांनी सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!!

   या उपक्रमातील दुसरे सदर आज देत आहे. 
*इयत्ता सातवी नागरिकशास्त्र मधील प्रकरण 1 - आपल्या संविधानाची ओळख*

   या प्रकरणाची pdf  पाठवत आहे त्याचा स्व अभ्यास करावा.

*दिनांक 16 एप्रिल 2020 वार गुरुवार रोजी सायंकाळी ५ ते ६ वेळेत या घटकावर आधारित ऑनलाईन टेस्ट* घेण्यात येईल.

                         Pdf डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


                       

       या उपक्रमातील चाचण्या *राष्ट्रीय दुर्बल घटक गुणवत्ता शिष्यवृत्ती ( NMMS )* व *रयत प्रज्ञाशोध परीक्षा ( RTS)* यांना उपयोगी पडू शकतात.
टेस्ट संबंधी सूचना व वेळ 16 तारखेला कळविण्यात येईल.

अधिक माहितीसाठी

https://neskurul.blogspot.com/

या संकेस्थळाला भेट द्यावी.

सर्वांना शुभेच्छा!!!

चाचणी बाबत काही सूचना :

तुम्हाला एक लिंक दिली जाईल 

दिलेल्या वेळेत लिंक ओपन करून 

बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत.

त्यामध्ये सुरवातीला 

ईमेल आयडी, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव , गाव, मोबाईल नंबर,  टाकून प्रत्यक्ष प्रश्ना पर्यंत जाता येते.
इमेल आय डी बरोबर टाकला तर सायंकाळी निकाल आपल्या इमेल वर मिळेल.

नंतर प्रश्न नीट वाचून

चारपैकी  कोणताही एक योग्य पर्याय निवडावा लागेल.

सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर सबमिट बटनवर क्लिक करायचे.

नंतर VIEW SCORE वर क्लिक केल्यावर तुम्ही सोडविलेले प्रश्न, चूक व बरोबर उत्तरे व गुण दिसतील.


संध्याकाळी 7.30 ते 8 दरम्यान  चाचणी सोडविले ल्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल पोस्ट केला जाईल.

तो आपल्यायला खालील लिंक वर पहावायास मिळेल.



https://neskurul.blogspot.com/

नागरिकशास्त्र  धडा 1 ला सर्व विद्यार्थ्यांनी वाचुन समजून घ्यावा. काही अडचण असल्यास ग्रुपवर / ब्लॉग पोस्ट कमेंट करून शंका विचारावी. जमल्यास पालकांनी मार्गदर्शन करावे .

या घटकावर आधारित चाचणी गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने होईल.

चाचणीची वेळ सायंकाळी 5 ते 6 असेल. याच वेळेत चाचणी सोडविता येईल.

साडेचार वाजता चाचणी लिंक देण्यात येईल.

बरोबर 5 वाजता चाचणी सुरू होईल व 6 वाजता संपेल. वेळेच्या अगोदर किंवा नंतर चाचणी सोडविता येणार 
नाही.

सर्वांनी चाचणी सोडविणे बंधनकारक आहे.

निकाल व बरोबर प्रश्नांची उत्तरे लगेच मिळतील.

चाचणी फक्त एकदाच सोडविता येणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक सोडवावी.

चाचणी सोडविण्यासाठी सूचना साडेचार वाजता देण्यात येतील.

आपला ईमेल आयडी व मोबाईल नंबर तयार ठेवावा.


वेळेच्या संदर्भात व इतर काही अडचणी असतील तर त्या सांगू शकता.


*श्री.  खरात व्ही डी.(सहशिक्षक),*

न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल

*STAY HOME STAY SAFE*

Sunday, April 12, 2020

चाचणी १- इतिहासाची साधने



चाचणी सोडविण्यासाठी  खालील चित्रावर टच / क्लिक करा.

 येथे टच करा.



निकाल 

निकाल पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.


https://drive.google.com/file/d/1h6ZDJgbEyl6VS4XbC0x-oq1fWnccv2oq/view?usp=sharing

Friday, March 20, 2020

एन.एम.एम.एस. परीक्षेत यश


NMMS परीक्षेत घाव्गावीत यश


अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

रयत शिक्षण संस्थेचे,
न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, कुरूल ता. मोहोळ जि. सोलापूर

राष्ट्रीय दुर्बल आर्थिक घटक शिष्यवृत्ती परीक्षा(NNMS) मध्ये   न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेज, कुरुल येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. सदर परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर झाली. यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. सदर विद्यार्थ्यांना प्रति वर्ष रुपये बारा हजार( १२०००/ ) प्रमाणे चार वर्षात एकूण 48 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रति विदयार्थी मिळणार आहेत. या परीक्षेमध्ये 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
1. भालेराव संस्कार नागेश SC-7
2. पाटील प्रथमेश धनंजय NTC-49
3. व्हटकर सानिका अरुण SC- 63
          या सर्व विद्यार्थ्यांना या विभाग प्रमुख सौ. गायकवाड व्ही.ए. तसेच सौ. माने एस.एम, बिराजदार ए.ए, आतकरे जी.एस, श्री. अक्कलकोटे एस.एस, श्रीमती सुर्वे पी.ए.  यांनी मार्गदर्शन केले आहे.

सदर विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन प्राचार्य श्री गणपाटील डी.एम. पर्यवेक्षक श्री. मोहिते डी.टी., रयत शिक्षण संस्थे च्या सल्लागार समितीच्या मध्य विभागाचे चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी श्री.कमलाकर महामुनी साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री. विलास काका पाटील, श्री.शत्रुघ्न जाधव, श्री.लिंगेश्वर निकम, श्री. दत्तात्रय बोंगे तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील पालक यांनी केले. 



Monday, March 16, 2020

कोरोना व्हायरस प्रादुर्भाव सुट्टी बाबत

विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की सध्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसचा  धोका टाळण्यासाठी शासकीय आदेशानुसार विद्यालयास दिनांक 17 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांनी सदर सुट्टीच्या काळात नियमितपणे अभ्यास करावा. सुट्टीनंतर लगेच आपणास द्वितीय सत्र परीक्षेस सामोरे जायचे आहे त्यामुळे अभ्यास सातत्य ठेवावे. पालकांनीही आपापल्या पाल्यांकडून नियमितणे अभ्यास करून घ्यावा.

 इयत्ता 10 वीचे पेपर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होतील याची नोंद घ्यावी.


सर्व विद्यार्थी व पालक यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमित केलेल्या सूचनांचा अवलंब करावा.
समाज माध्यमातील अफवांवर विश्वास ठेऊ नये.
             

Monday, March 2, 2020

10 वी ,12 वी विद्यार्थी शुभेच्छा

इयत्ता 10 वी ,12 वी 2020 प्रविष्ट  विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Saturday, January 25, 2020

७१ वा प्रजासत्ताक दिन सोहळा निमंत्रण



 रयत शिक्षण संस्थेचे,
न्यु इंग्लिश स्कुल व ज्यु.  कॉलेज कुरुल ता.मोहळ जि.सोलापुर.



         @@ ७१ वा प्रजासत्ताक दिन सोहळा @@



 विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दि. 26/01/2020 वार रविवार  रोजी सकाळी ठिक 8.30 वाजता 71 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त  ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी कुरुल पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, पालक, माजी विद्यार्थी, विद्यालयाचे हितचिंतक तसेच शिक्षण प्रेमी यांनी या सोहळ्यास उपस्थित  राहावे ही विनंती.


*==================*
    कळावे,   
  सर्व सेवकवृंद न्यू इंग्लिश स्कूल कुरूल
*==================*

यलाप्पा व अभिषेक यांच्या जिद्दीची दखल

यलाप्पा व अभिषेक यांच्या जिद्दीची दखल धन्यवाद दै.पुण्यनगरी(वार्ताहार श्री सुहासजी घोडके ) व इन न्यूज सोलापूर



महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"