Menubar

अभिनंदन!! अभिनंदन !! अभिनंदन!! ✌🌹🥇🥇🥇🏆🏆 ⚜ रयत शिक्षण संस्थेचे, ⚜ न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल. ⚜ 💐💐💐💐💐💐💐💐 NMMS परीक्षा निकाल 2024 ✌💐💐🏆🥇🥇💐💐 !!! या वर्षी उत्तुंग यश !!! 💫 एकूण परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी - 47💫 ⭐ परीक्षेत पात्र विद्यार्थी - 30 💫 NMMS शिष्यवृत्ती धारक 2-विद्यार्थी 🏆सारथी शिष्यवृत्ती धारक - 16 विद्यार्थी 🥇🥇🥇2 विद्यार्थ्यांना 60,000 रुपये प्रमाणे 1,20,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार🥇🥇🥇 🏆सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी - 16 प्रति विद्यार्थी 38,400 रुपये प्रमाणे 6,14,400/रुपये शिष्यवृत्ती मिळणार.🏆👍👍👍 🥇🥇🏆🏆 एकूण 7,34,400/रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार🏆🏆🥇🥇 NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी ⭐ पाटकर रोहन अंकुश ⭐ कांबळे रोहन शंकर सारथी शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी - 16 ⭐ सरवळे प्रसन्न प्रशांत ⭐कु. जाधव प्रणाली काकासाहेब ⭐ कु.गायकवाड प्रशाली केराप्पा ⭐ पवार यश विजय ⭐ साळुंके सूर्यन संजयकुमार ⭐ जाधव समर्थ रामचंद्र ⭐क्षीरसागर शंभुराजे अविनाश ⭐ अवताडे प्रज्वल संभाजी ⭐ कु. घोडके समृद्धी हरिश्चंद्र ⭐ कु.जाधव जुई संजय ⭐ताड आदर्श बाळू ⭐ निकम प्रणव परमेश्वर ⭐ घोडके सुमित नितीन ⭐जाधव ओम संतोष ⭐ झिंजुर्डे मंथन मोहन ⭐ कु.साळुंखे संस्कृती समाधान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐 विभाग प्रमुख - श्रीमती. सुर्वे पी ए. सौ. माने एस. एम., श्री. खाडे व्ही. एन, श्री. बिराजदार ए. ए., श्री. बोईनवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक मा. श्री. मदने जे. पी., गुरुकुल विभाग प्रमुख श्री. खरात एन आर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल कुरूल स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती कुरूल पंचक्रोशीतील सर्व पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले 🏆🏆🥇🥇🥇🏆🥇🥇🥇🥇✌✌💐

Sunday, November 6, 2016

चला स्वतःचे VDO बनवूया

चला स्वतःचे VDO बनवूया



स्मार्टफोनवरील कॅमेऱ्याच्या वाढत्या क्षमतेमुळे प्रत्येक घडामोडीचे चित्रीकरण करण्याकडे कल वाढत चालला आहे. अगदी लग्नसोहळय़ातील ‘कॅण्डीड’ क्षणांपासून घरातल्या घरात झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीपर्यंतच्या घटनांचे या कॅमेऱ्यानिशी ‘व्हिडीओ रेकॉर्डिग’ करण्यात येते. हॅण्डीकॅम किंवा डिजिटल कॅमेऱ्यांनिशी स्वत:च चित्रीकरण करणारेही अनेक आहेत. पण केवळ ‘व्हिडीओ रेकॉर्ड’ करून तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करता येत नाही. त्या आठवणी अधिक खुलवण्यासाठी ‘व्हिडीओ एडिटिंग’ करावेच लागते. सर्वसामान्य वापरकर्ते आपल्याला जमेल त्या पद्धतीने ‘व्हिडीओ एडिटिंग’ करतात किंवा बाजारात कोणत्याही फोटोग्राफरकडे जाऊन व्हिडीओ एडिटिंग केले जाते. मात्र, पहिल्या पद्धतीत व्हिडीओचे संपादन चुकण्याची भीती असते तर दुसऱ्यात पैसे मोजावे लागतात. अशा वेळी संगणकावर उपलब्ध असलेले मोफत पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर एक चांगला पर्याय ठरू शकतात. अशाच काही महत्त्वाच्या ‘व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर’विषयी..

विंडोज मूव्ही मेकर

कोणत्याही संगणकासोबत मोफत इन्स्टॉल होऊनच उपलब्ध असलेला ‘विंडोज मुव्ही मेकर’ हे अतिशय उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन आहे. संगणकावरील व्हिडीओ क्लिप्स केवळ ‘क्लिक’ आणि ‘ड्रॅग’ करून एडिटिंग करता येते. एका वेळी अनेक व्हिडीओ ‘क्लिक’ आणि ‘ड्रॅग’ केल्यानंतर ते निवडलेल्या क्रमाने दर्शवले जातात. त्यानंतर या व्हिडीओला ‘साउंडट्रॅक’ जोडणे, कॅप्शन नोंदवणे, व्हिडीओची श्रेयनामावली तयार करणे अशा गोष्टी करता येतात. याशिवाय व्हिडीओ ‘क्रॉप’ करणे, त्यातील रंगसदृशता कमी-अधिक करणे अशा नेहमीच्या सुविधाही विंडोज मूव्ही मेकरमध्ये उपलब्ध आहेत. हे व्हिडीओ ‘सेव्ह’ करून थेट ‘यूटय़ूब’वर अपलोडही करता येतात.

केट्स व्हिडीओ टूलकिट

रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओचे ‘एडिटिंग’ करणे अतिशय कौशल्याचे काम असते. मात्र, व्हिडीओची लांबी कमी करणे, ठरावीक दृश्य कापणे, त्यातील रंगात कमी-अधिक करणे अशा गोष्टी आपल्याला सहज शक्य असतात. ‘केट्स व्हिडीओ टूलकिट’मध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तुम्ही एका व्हिडीओचे दोन व्हिडीओ करू शकता किंवा दोन व्हिडीओ एकमेकांना जोडूही शकता. याशिवाय साउंडट्रॅक जोडणे, कॅप्शन नोंदवणे, श्रेयनामावली तयार करणे अशा गोष्टींसाठी या अ‍ॅप्लिकेशनमध्ये सुविधा उपलब्ध आहे.

विवा व्हिडीओ

अलीकडे अनेक अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर संगणकावर इन्स्टॉल न करता क्लाउड तंत्रज्ञानाच्या आधारे सव्‍‌र्हरवर साठवून तेथून हव्या त्या उपकरणावर वापरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. संगणकावरील हार्डडिस्कची जागा व्यापली जाऊ नये म्हणून अनेक जण आपले सॉफ्टवेअर ‘क्लाउड’वर इन्स्टॉल करतात. त्यामुळे जागा वाचतेच शिवाय हवी तेव्हा हव्या त्या संगणकावरून संबंधित सॉफ्टवेअर वापरता येते. अशाच सॉफ्टवेअरमध्ये ‘वीव्हिडीओ’चे नाव घेता येईल. फेसबुक, ट्विटर, यूटय़ूबसारख्या समाजमाध्यम संकेतस्थळांवर व्हिडीओ शेअर करण्यासाठी हे सॉफ्टवेअर अतिशय उपयुक्त आहे. या अ‍ॅप्लिकेशनसोबत पाच जीबीची क्लाउड स्पेसही मिळते. यावर व्हिडीओ एडिटिंगसाठी ‘स्पेशल इफेक्ट’ही पुरवण्यात आले आहेत.

एव्हिडमिक्स

व्हिडीओ जोडणे, तोडणे, लोगो टाकणे, क्रॉप करणे, व्हिडीओ रोटेट करणे, रंगछटा बदलणे अशी अनेक कामे करणारा एव्हिडमक्स हा छोटा पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर आहे. यामध्ये व्हिडीओ एडिटिंगच्या सामान्य सुविधा उपलब्ध आहेतच; पण स्पेशल इफेक्टचे पर्यायही येथे उपलब्ध आहेत.

व्हीएसडीसी फ्री व्हिडीओ एडिटर

अवघ्या ३२७ केबी आकाराचा हा व्हिडीओ एडिटर छोटा असला तरी त्याची कार्यक्षमता दांडगी आहे. या सॉफ्टवेअरमध्ये एकाच वेळी अनेक व्हिडीओ ‘ओपन’ करता येतात. कट, कॉपी, पेस्ट, क्रॉप, ट्रिम अशा नेहमीच्या पर्यायासोबतच साउंडट्रॅक जोडणे, कॅप्शन टाकणे अशा अनेक गोष्टी या एडिटरच्या मदतीने करता येतात. मात्र, या व्हिडीओ एडिटरवर फक्त ‘एव्हीआय’ फाइल्सच एडिट करता येतात.

No comments:

Post a Comment

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"