Menubar

अभिनंदन!! अभिनंदन !! अभिनंदन!! ✌🌹🥇🥇🥇🏆🏆 ⚜ रयत शिक्षण संस्थेचे, ⚜ न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल. ⚜ 💐💐💐💐💐💐💐💐 NMMS परीक्षा निकाल 2024 ✌💐💐🏆🥇🥇💐💐 !!! या वर्षी उत्तुंग यश !!! 💫 एकूण परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी - 47💫 ⭐ परीक्षेत पात्र विद्यार्थी - 30 💫 NMMS शिष्यवृत्ती धारक 2-विद्यार्थी 🏆सारथी शिष्यवृत्ती धारक - 16 विद्यार्थी 🥇🥇🥇2 विद्यार्थ्यांना 60,000 रुपये प्रमाणे 1,20,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार🥇🥇🥇 🏆सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी - 16 प्रति विद्यार्थी 38,400 रुपये प्रमाणे 6,14,400/रुपये शिष्यवृत्ती मिळणार.🏆👍👍👍 🥇🥇🏆🏆 एकूण 7,34,400/रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार🏆🏆🥇🥇 NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी ⭐ पाटकर रोहन अंकुश ⭐ कांबळे रोहन शंकर सारथी शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी - 16 ⭐ सरवळे प्रसन्न प्रशांत ⭐कु. जाधव प्रणाली काकासाहेब ⭐ कु.गायकवाड प्रशाली केराप्पा ⭐ पवार यश विजय ⭐ साळुंके सूर्यन संजयकुमार ⭐ जाधव समर्थ रामचंद्र ⭐क्षीरसागर शंभुराजे अविनाश ⭐ अवताडे प्रज्वल संभाजी ⭐ कु. घोडके समृद्धी हरिश्चंद्र ⭐ कु.जाधव जुई संजय ⭐ताड आदर्श बाळू ⭐ निकम प्रणव परमेश्वर ⭐ घोडके सुमित नितीन ⭐जाधव ओम संतोष ⭐ झिंजुर्डे मंथन मोहन ⭐ कु.साळुंखे संस्कृती समाधान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐 विभाग प्रमुख - श्रीमती. सुर्वे पी ए. सौ. माने एस. एम., श्री. खाडे व्ही. एन, श्री. बिराजदार ए. ए., श्री. बोईनवाड सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक मा. श्री. मदने जे. पी., गुरुकुल विभाग प्रमुख श्री. खरात एन आर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी न्यू इंग्लिश स्कूल कुरूल स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती कुरूल पंचक्रोशीतील सर्व पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले 🏆🏆🥇🥇🥇🏆🥇🥇🥇🥇✌✌💐

Saturday, November 5, 2016

शिक्षकांसाठी उपयोगी वेबसाईट

शिक्षकांसाठी उपयुक्त वेबसाईट्स

"आई वडिलांबरोबर ज्याना 'आचार्य देवो भव' म्हणून मान दिला जातो तो शिक्षकी पेशा वर वर दिसतो तेवढा साधा नाही. दिलेला विषय,आणि त्यातला दिलेला अभ्यासक्रम शिकविण्याची पाऊण/ अर्धा तासांची पाठी टाकला की झाला पगार लागू असं म्हणून कार्य करण्याचे हे क्षेत्रच नव्हे. आपल्या हातुन आजचे लहानगे विद्यार्थी शिकताहेत आपण त्याना उद्याचे देशकर्ते महणून उभे करीत आहोत ही जाणीव मनात ठेवून जे शिक्षक मित्र सतत धडपड करत असतात अशांसाठी काही उपयूकत वेबसाईट्स ......."
http://www.education-world.com
वर्गात शि‍कवित असताना अनंत अडचणी सतत येत असतात. एखादा घटक कसा शिकवावा म्‍हणजे विद्यार्थ्‍याना लवकर समजेल?  कोणते शैक्षणिक साहित्‍य वापरावे म्‍हणजे अध्‍यापन प्रभावीपणे होईल? असे अनेक प्रश्‍न कृतिशिल शिक्ष्‍ाकाना सतत भेडसावत असतात. अशावेळी जर आपण Education world या सारख्‍या वेबसाईटचा उपयोग करुन घेतला तर अध्‍यापन करताना खूपच मदत होणार आहे.         ही साईट शिक्षकांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त असे साईट आहे. यावर पाठनियोजन, अभ्‍यासक्रम, अध्‍यापनाचे विविध तंत्रज्ञान उत्‍कृष्‍टपणे मांडलेले आहे. असे हे बहुपयोगी वेबसाईटला एखदा आवश्‍य भेट द्याच.
http://www.teacherfreebies.com/
 Teacherfreebies  या नावाप्रमाणाचे हे वेबसाईट शिक्षक मित्रांसाठी १०० हून अधिक साहित्‍य उपलब्‍ध करुन देते तेही अगदी मोफत. या वेबसाईटचे आणखिन एक वैशिट्य  म्‍हणजे पुस्‍तकापासून ते थेट कॅटलॉग पर्यंतचे सर्व साहित्‍य चक्‍क मोफत मिळते. शिक्षणाविषयी नवनविन बातम्‍या, शोध, अध्‍यापन तंत्रे, विद्यार्थ्‍याना आकर्षित करुन घेण्‍यासाठी वापरावयाचे विविध साहित्‍य,साधने अतिशय सुटसुटीत मांडणी या साईटमध्‍ये आढळते. मला आवडलेल्‍या साईटमधून हे एक साईट आहे. या साईटमध्‍ये शिक्षकांसाठी असलेले विविध साईटचे खुप मोठी लिस्‍ट या मध्‍ये दिलेली आहे.
http://discoveryschools.com/
 हा साईट खास करुन विद्यार्थी, शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी डिझाईन केलेला आहे. जरी सर्वांसाठी सेवा उपलब्‍द करुन देत असला तरी शिक्षकांसाठी अनेक उपयुक्‍त सदर या वेबसाईटमध्‍ये अनेक ठिकाणी आढळून येतात. लेसन प्‍लॅनपासून ते अध्‍यापन साहित्‍यापर्यंत अनेक गोष्‍टी आढळून येतात. तसेच अनेक वेबसाईटचे लिंकही सुंदरप्रकारे देण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. अनेक शैक्षणिक गेम्‍स, पझल्स, मेज अशाप्रकारे बुध्‍दीला खुराक देणारे विविध साधनेही हा वेबसाईट पुरविण्‍याचा प्रामाणिक प्रयत्‍न केल्‍याचे दिसून येते.
http://www.teachervision.fen.com/
शिक्षकांना जे शिकवावे लागते ते सर्व बाबी या वेबसाईटमधून मिळते. हे वेबसाईटचे वर्णन Learning Network  करते. या वेबमध्‍ये नवनविन पध्‍दती, विद्यार्थ्‍याना आकर्षित करतील असे माहिती, कोडी, विविध विषय सोपे करुन कसे सांगावे याचे टिप्‍स असे वैविध्‍दपूर्ण मांडणी या साईटचे वैशिट्य म्‍हणावे लागेल.
आणखिन काही वेबसाईट्स    www.teacherpathfinder.org  www.connectingstudents.com  www.padhaee.com  www.teachnet.com

No comments:

Post a Comment

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"