Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Sunday, November 27, 2016

काही महत्वाचे फुल फॉर्म्स

1 PAN - पैशांच्या देवाणघेवाणीदरम्यान पॅनकार्डचा ओळखपत्र म्हणून फायदा होतो. मात्र या पॅनकार्डचा फुलफॉर्म आहे परमनंट अकाऊं नंबर(permanant account number).
2. PDF- अनेकांना पीड़ीएफचा फुलफॉर्म माहीत नसेल. पीडीएफ म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मट(portable document format)
3. HDFC -अनेकदा हा शब्द ऐकला असेल. HDFC म्हणजे 'हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (housing development finance corporation)
4. SIM - या शब्दाचा वापर 90 टक्के लोक करतात. मात्र नक्कीच तुम्हाला याचा फुलफॉर्म माहीत नसेल. सिमचा फुलफॉर्म सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module) असा आहे.
5. ATM - याचा वापर तर 10 पैकी 8 लोक करतात. एटीएमचा फुलफॉर्म ऑटोमेटेड टेलर मशीन(Automated Teller machine)
6. IFSC -याचा फुलफॉर्म आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड() Indian Financial System Code) आहे.
7. FSSAI(fssai) - याचा फुलफॉर्म आहे 'फुल सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया' )
8-Wi-Fi-
याचा फुलफॉर्म आहे 'वायरलेस फिडेलिटी'(wireless fidelity)
Some Fullforms of important words : -
1.) GOOGLE - Global Organization Of Oriented Group Language Of Earth.
2.) YAHOO - Yet Another Hierarchical Officious Oracle.
3.) WINDOW - Wide Interactive Network Development for Office work Solution.
4.) COMPUTER - Common Oriented Machine Particularly United and used under Technical and Educational Research.
5.) VIRUS - Vital Information Resources Under Siege.
6.) UMTS - Universal Mobile Telecommunicati ons System.
7.) AMOLED - Active-matrix organic light-emitting diode.
8.) OLED - Organic light-emitting diode.
9.) IMEI - International Mobile Equipment Identity.
10.) ESN - Electronic Serial Number.
11.) UPS - Uninterruptible power supply.
12. HDMI - High-Definition Multimedia Interface.
13.) VPN - Virtual private network.
14.) APN - Access Point Name.
15.) SIM - Subscriber Identity Module.
16.) LED - Light emitting diode.
17.) DLNA - Digital Living Network Alliance.
18.) RAM - Random access memory.
19.) ROM - Read only memory.
20.) VGA - Video Graphics Array.
21.) QVGA - Quarter Video Graphics Array.
22.) WVGA - Wide video graphics array.
23.) WXGA - Widescreen Extended Graphics Array.
24.) USB - Universal serial Bus.
25.) WLAN - Wireless Local Area Network.
26.) PPI - Pixels Per Inch.
27.) LCD - Liquid Crystal Display.
28.) HSDPA - High speed down-link packet access.
29.) HSUPA - High-Speed Uplink Packet Access.
30.) HSPA - High Speed Packet Access.
31.) GPRS - General Packet Radio Service.
32.) EDGE - Enhanced Data Rates for Globa Evolution.
33.) NFC - Near field communication.
34.) OTG - On-the-go.
35.) S-LCD - Super Liquid Crystal Display.
36.) O.S - Operating system.
37.) SNS - Social network service.
38.) H.S - HOTSPOT.
39.) P.O.I - Point of interest.
40.) GPS - Global Positioning System.
41.) DVD - Digital Video Disk.
42.) DTP - Desk top publishing.
43.) DNSE - Digital natural sound engine.
44.) OVI - Ohio Video Intranet.
45.) CDMA - Code Division Multiple Access.
46.) WCDMA - Wide-band Code Division Multiple Access.
47.) GSM - Global System for Mobile Communications.
48.) WI-FI - Wireless Fidelity.
49.) DIVX - Digital internet video access.
50.) APK - Authenticated public key.
51.) J2ME - Java 2 micro edition.
52.) SIS - Installation source.
53.) DELL - Digital electronic link library.
54.) ACER - Acquisition Collaboration Experimentation Reflection.
55.) RSS - Really simple syndication.
56.) TFT - Thin film transistor.
57.) AMR- Adaptive Multi-Rate.
58.) MPEG - moving pictures experts group.
59.) IVRS - Interactive Voice Response System.
60.) HP - Hewlett Packard.

Sunday, November 13, 2016

चला लोगो बनवूया


चला लोगो बनवूया


प्रथम play store मधून pics Art app घ्या 
👇👇👇👇👇👇
App open करा 
खाली + टच करा 
खाली draw सिलेक्ट करा 
Blank निवडा
Template मधून size निवडा
उदा.-2048 × 2048
सिलेक्ट केलेले width व Height येथे दिसते 
मग orientation निवडा उभे की आडवे 
मग ok करा
आता blank page दिसेल 
खाली 6 नं ला दिलेल्या आकृतीला सिलेक्ट करा 
आता समोरील आकृती मधील गोल निवडा व size कमी जास्त करून घ्या 
आता stroke सिलेक्ट करा व ok करा 
आता परत आपले blank page दिसेल 
आता गोल draw करा size हवी तेवढी ठेवा 
परत अजून एक गोल त्याच  गोलात  काढा 
आता परत खाली 6 नं चे  निवडा
गोल निवडा व खाली fill निवडा ok करा
आता खालील 1 नं वरील रंगीत चौकोन निवडा यातील हवा तो रंग सिलेक्ट करा व ✅ या वर टिक करा 
आता परत आपण गोल काढला ते पान दिसेल त्याच्या आत  परत गोल काढा 
तुम्ही जो रंग निवडला त्याच रंगाचा गोल येथे दिसेल
आता वरती Done करा 
मग तुम्हाला खाली 2 option येतील त्यातील Edit Image सिलेक्ट करा 
आता आपला तयार गोल व खाली नवीन option दिसतील(tools)
  खालील 4 नं मधील add फोटो टच करा 
आता फोटो निवडा व वरती Add ला टच करा 
आता तुम्हाला तुम्ही निवडलेला फोटो दिसेल 
आता खालील 5 नं चे Shape select करा 
आता खाली विविध आकार दिसतील
यातील गोल निवडा व फोटो जवळील बाणाने गोलाची size हवी तेवढी करून घ्या 
खाली size हा option आहे व शेजारी colour बॉक्स आहे त्याप्रमाणे size व रंग निवडा 
मग वरती उजवीकडे कोपऱ्यात➡आहे तो टच करा आता गोलात फोटो दिसेल 
आता उजवीकडे कोपऱ्यातील  ✅ टच करा
आपण तयार केलेल्या पहिल्या रंगीत गोलात निवडलेला फोटो गोलात दिसतो 
आता हा फोटो size कमी जास्त करून बरोबर गोलाच्या मध्यभागी ठेवा
(जर हा फोटो नको असेल तर फोटोवर डावीकडे वरती ❌ हे चिन्ह गोलात दिसते ते टच केले की फोटो कट होतो)
आता फोटो गोलात मध्यभागी adjust केल्यावर वरती उजवीकडे ✅टच करा
आता बघा - पहिल्या रंगीत गोलात आपण सिलेक्ट केलेला फोटो मध्यभागी दिसतो 
आता खालील 9 नं चे (T) Text निवड व type करा व वरील उजवीकडील ✅ टच करा 
तुम्ही type केले फोटोच्या वर किंवा खाली घ्यायचे ते ठरवा 
मग खालील फॉन्ट निवडा व colour निवडा 
आता खालील शेवटी असलेले Bend निवडा
Bend डावीकडे वा उजवीकडे adjest करा 
आता परत वरती + मधील text घ्या व परत हीच कृती करा 
आता यातील sticker निवडा व रंगीत गोलावर adjest करा (त्याची size लहान मोठी करता येते व रंग ही बदलता येतो)
आता आपला लोगो तयार 
 वरील उजवीकडील ✅ ok करा
आता काही बदल करायचा ते पहा व त्याप्रमाणे बदल करा 
नसेल तर वरील उजवी कडील ✅ ok करा 
आता तयार लोगो व त्याखाली पर्याय दिसतील 
त्यातील gallery निवडा 
तुमचा तयार लोगो gallery मध्ये save होतो 

Saturday, November 12, 2016

चला VDO बनवूया भाग 2

आपल्या जवळ स्मार्ट फोन असेल तर आपला वर्ग स्मार्ट .मोबाईल द्वारे vdo मेकिंग .आपल्या वर्गासाठी आपणच .vdo तयार करुया .आणि आपल्या वर्गाची गुणवत्ता वाढवूया .💐🌺💐
▶ Vdo मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज vdo .
2) शैक्षणिक vdo
▶ आपल्या कडे viva vid eo app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या ▶Viva video ओपन करा
▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .
▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे
▶ सर्व photo done करा
▶ Video बोर्ड येईल
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील
▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल
▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो
▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल .
▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल ok vdo रील दिसली का
▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .त्या मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
 ▶खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का
▶ Vdo च्या वरील बाजूस ✅अशी खूण आह.आहे का
▶ वरील ✅चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच vdo च्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdo वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅या चिन्हावर क्लिक करा vdo खाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdo थांबतो रील थांबते .नंतर थांबा
▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा
▶ एक स्लाइड संपताच vdo च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा vdo थांबेल
▶ नंतर vdo च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे तुमचे नाव vdo वर फिक्स होईल
▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा kruti करा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdo तयार होईल
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
▶[ Vdo मधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdo तयार झाला .
▶ तो vdo draft मधे सेव करा
▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdo मोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .शेअर करु नका .
▶ आता थांबु या vdo तयार झाला झाला.
*All d best* 👍करा तयार video....

Sunday, November 6, 2016

चला स्वतःचे VDO बनवूया

चला स्वतःचे VDO बनवूया



स्मार्टफोनवरील कॅमेऱ्याच्या वाढत्या क्षमतेमुळे प्रत्येक घडामोडीचे चित्रीकरण करण्याकडे कल वाढत चालला आहे. अगदी लग्नसोहळय़ातील ‘कॅण्डीड’ क्षणांपासून घरातल्या घरात झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीपर्यंतच्या घटनांचे या कॅमेऱ्यानिशी ‘व्हिडीओ रेकॉर्डिग’ करण्यात येते. हॅण्डीकॅम किंवा डिजिटल कॅमेऱ्यांनिशी स्वत:च चित्रीकरण करणारेही अनेक आहेत. पण केवळ ‘व्हिडीओ रेकॉर्ड’ करून तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करता येत नाही. त्या आठवणी अधिक खुलवण्यासाठी ‘व्हिडीओ एडिटिंग’ करावेच लागते. सर्वसामान्य वापरकर्ते आपल्याला जमेल त्या पद्धतीने ‘व्हिडीओ एडिटिंग’ करतात किंवा बाजारात कोणत्याही फोटोग्राफरकडे जाऊन व्हिडीओ एडिटिंग केले जाते. मात्र, पहिल्या पद्धतीत व्हिडीओचे संपादन चुकण्याची भीती असते तर दुसऱ्यात पैसे मोजावे लागतात. अशा वेळी संगणकावर उपलब्ध असलेले मोफत पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर एक चांगला पर्याय ठरू शकतात. अशाच काही महत्त्वाच्या ‘व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर’विषयी..

विंडोज मूव्ही मेकर

कोणत्याही संगणकासोबत मोफत इन्स्टॉल होऊनच उपलब्ध असलेला ‘विंडोज मुव्ही मेकर’ हे अतिशय उपयुक्त अ‍ॅप्लिकेशन आहे. संगणकावरील व्हिडीओ क्लिप्स केवळ ‘क्लिक’ आणि ‘ड्रॅग’ करून एडिटिंग करता येते. एका वेळी अनेक व्हिडीओ ‘क्लिक’ आणि ‘ड्रॅग’ केल्यानंतर ते निवडलेल्या क्रमाने दर्शवले जातात. त्यानंतर या व्हिडीओला ‘साउंडट्रॅक’ जोडणे, कॅप्शन नोंदवणे, व्हिडीओची श्रेयनामावली तयार करणे अशा गोष्टी करता येतात. याशिवाय व्हिडीओ ‘क्रॉप’ करणे, त्यातील रंगसदृशता कमी-अधिक करणे अशा नेहमीच्या सुविधाही विंडोज मूव्ही मेकरमध्ये उपलब्ध आहेत. हे व्हिडीओ ‘सेव्ह’ करून थेट ‘यूटय़ूब’वर अपलोडही करता येतात.

केट्स व्हिडीओ टूलकिट

रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओचे ‘एडिटिंग’ करणे अतिशय कौशल्याचे काम असते. मात्र, व्हिडीओची लांबी कमी करणे, ठरावीक दृश्य कापणे, त्यातील रंगात कमी-अधिक करणे अशा गोष्टी आपल्याला सहज शक्य असतात. ‘केट्स व्हिडीओ टूलकिट’मध्ये या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तुम्ही एका व्हिडीओचे दोन व्हिडीओ करू शकता किंवा दोन व्हिडीओ एकमेकांना जोडूही शकता. याशिवाय साउंडट्रॅक जोडणे, कॅप्शन नोंदवणे, श्रेयनामावली तयार करणे अशा गोष्टींसाठी या अ‍ॅप्लिकेशनमध्ये सुविधा उपलब्ध आहे.

विवा व्हिडीओ

अलीकडे अनेक अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर संगणकावर इन्स्टॉल न करता क्लाउड तंत्रज्ञानाच्या आधारे सव्‍‌र्हरवर साठवून तेथून हव्या त्या उपकरणावर वापरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. संगणकावरील हार्डडिस्कची जागा व्यापली जाऊ नये म्हणून अनेक जण आपले सॉफ्टवेअर ‘क्लाउड’वर इन्स्टॉल करतात. त्यामुळे जागा वाचतेच शिवाय हवी तेव्हा हव्या त्या संगणकावरून संबंधित सॉफ्टवेअर वापरता येते. अशाच सॉफ्टवेअरमध्ये ‘वीव्हिडीओ’चे नाव घेता येईल. फेसबुक, ट्विटर, यूटय़ूबसारख्या समाजमाध्यम संकेतस्थळांवर व्हिडीओ शेअर करण्यासाठी हे सॉफ्टवेअर अतिशय उपयुक्त आहे. या अ‍ॅप्लिकेशनसोबत पाच जीबीची क्लाउड स्पेसही मिळते. यावर व्हिडीओ एडिटिंगसाठी ‘स्पेशल इफेक्ट’ही पुरवण्यात आले आहेत.

एव्हिडमिक्स

व्हिडीओ जोडणे, तोडणे, लोगो टाकणे, क्रॉप करणे, व्हिडीओ रोटेट करणे, रंगछटा बदलणे अशी अनेक कामे करणारा एव्हिडमक्स हा छोटा पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर आहे. यामध्ये व्हिडीओ एडिटिंगच्या सामान्य सुविधा उपलब्ध आहेतच; पण स्पेशल इफेक्टचे पर्यायही येथे उपलब्ध आहेत.

व्हीएसडीसी फ्री व्हिडीओ एडिटर

अवघ्या ३२७ केबी आकाराचा हा व्हिडीओ एडिटर छोटा असला तरी त्याची कार्यक्षमता दांडगी आहे. या सॉफ्टवेअरमध्ये एकाच वेळी अनेक व्हिडीओ ‘ओपन’ करता येतात. कट, कॉपी, पेस्ट, क्रॉप, ट्रिम अशा नेहमीच्या पर्यायासोबतच साउंडट्रॅक जोडणे, कॅप्शन टाकणे अशा अनेक गोष्टी या एडिटरच्या मदतीने करता येतात. मात्र, या व्हिडीओ एडिटरवर फक्त ‘एव्हीआय’ फाइल्सच एडिट करता येतात.

Saturday, November 5, 2016

शिक्षकांसाठी उपयोगी वेबसाईट

शिक्षकांसाठी उपयुक्त वेबसाईट्स

"आई वडिलांबरोबर ज्याना 'आचार्य देवो भव' म्हणून मान दिला जातो तो शिक्षकी पेशा वर वर दिसतो तेवढा साधा नाही. दिलेला विषय,आणि त्यातला दिलेला अभ्यासक्रम शिकविण्याची पाऊण/ अर्धा तासांची पाठी टाकला की झाला पगार लागू असं म्हणून कार्य करण्याचे हे क्षेत्रच नव्हे. आपल्या हातुन आजचे लहानगे विद्यार्थी शिकताहेत आपण त्याना उद्याचे देशकर्ते महणून उभे करीत आहोत ही जाणीव मनात ठेवून जे शिक्षक मित्र सतत धडपड करत असतात अशांसाठी काही उपयूकत वेबसाईट्स ......."
http://www.education-world.com
वर्गात शि‍कवित असताना अनंत अडचणी सतत येत असतात. एखादा घटक कसा शिकवावा म्‍हणजे विद्यार्थ्‍याना लवकर समजेल?  कोणते शैक्षणिक साहित्‍य वापरावे म्‍हणजे अध्‍यापन प्रभावीपणे होईल? असे अनेक प्रश्‍न कृतिशिल शिक्ष्‍ाकाना सतत भेडसावत असतात. अशावेळी जर आपण Education world या सारख्‍या वेबसाईटचा उपयोग करुन घेतला तर अध्‍यापन करताना खूपच मदत होणार आहे.         ही साईट शिक्षकांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त असे साईट आहे. यावर पाठनियोजन, अभ्‍यासक्रम, अध्‍यापनाचे विविध तंत्रज्ञान उत्‍कृष्‍टपणे मांडलेले आहे. असे हे बहुपयोगी वेबसाईटला एखदा आवश्‍य भेट द्याच.
http://www.teacherfreebies.com/
 Teacherfreebies  या नावाप्रमाणाचे हे वेबसाईट शिक्षक मित्रांसाठी १०० हून अधिक साहित्‍य उपलब्‍ध करुन देते तेही अगदी मोफत. या वेबसाईटचे आणखिन एक वैशिट्य  म्‍हणजे पुस्‍तकापासून ते थेट कॅटलॉग पर्यंतचे सर्व साहित्‍य चक्‍क मोफत मिळते. शिक्षणाविषयी नवनविन बातम्‍या, शोध, अध्‍यापन तंत्रे, विद्यार्थ्‍याना आकर्षित करुन घेण्‍यासाठी वापरावयाचे विविध साहित्‍य,साधने अतिशय सुटसुटीत मांडणी या साईटमध्‍ये आढळते. मला आवडलेल्‍या साईटमधून हे एक साईट आहे. या साईटमध्‍ये शिक्षकांसाठी असलेले विविध साईटचे खुप मोठी लिस्‍ट या मध्‍ये दिलेली आहे.
http://discoveryschools.com/
 हा साईट खास करुन विद्यार्थी, शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी डिझाईन केलेला आहे. जरी सर्वांसाठी सेवा उपलब्‍द करुन देत असला तरी शिक्षकांसाठी अनेक उपयुक्‍त सदर या वेबसाईटमध्‍ये अनेक ठिकाणी आढळून येतात. लेसन प्‍लॅनपासून ते अध्‍यापन साहित्‍यापर्यंत अनेक गोष्‍टी आढळून येतात. तसेच अनेक वेबसाईटचे लिंकही सुंदरप्रकारे देण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. अनेक शैक्षणिक गेम्‍स, पझल्स, मेज अशाप्रकारे बुध्‍दीला खुराक देणारे विविध साधनेही हा वेबसाईट पुरविण्‍याचा प्रामाणिक प्रयत्‍न केल्‍याचे दिसून येते.
http://www.teachervision.fen.com/
शिक्षकांना जे शिकवावे लागते ते सर्व बाबी या वेबसाईटमधून मिळते. हे वेबसाईटचे वर्णन Learning Network  करते. या वेबमध्‍ये नवनविन पध्‍दती, विद्यार्थ्‍याना आकर्षित करतील असे माहिती, कोडी, विविध विषय सोपे करुन कसे सांगावे याचे टिप्‍स असे वैविध्‍दपूर्ण मांडणी या साईटचे वैशिट्य म्‍हणावे लागेल.
आणखिन काही वेबसाईट्स    www.teacherpathfinder.org  www.connectingstudents.com  www.padhaee.com  www.teachnet.com

क्षणापासून मनापर्यंत

पुढच्या क्षणी आपण असू की नसू याची खात्री माणसाला देता येत नाही. तरीही तो आपल्या भविष्याविषयी चिंताग्रस्त, आपल्या कर्तृत्वाविषयी तणावग्रस्त आणि आपल्या प्रॉपर्टीविषयी भयग्रस्त स्थितीत का असतो, हे लक्षात येत नाही. या तिन्ही दिशांनी त्याचे लक्ष सतत विचलित केल्याने हाती घेतलेले कोणतेही काम तो नीट पूर्ण करू शकत नाही. त्याने खरी काळजी घेतली पाहिजे ती आजच्या दिवसाची, हातातल्या कामाची, आत्ताच्या क्षणाची. या क्षणी जर तो शरीराने आणि मनाने सक्षम असला तरच जगण्याचा आनंद व्यवस्थित घेऊ शकतो आणि हातातील कामही यशस्वीपणे पूर्ण करू शकतो.
एक आजीबाई आयुष्यात प्रथमच पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाल्या. जाण्यापूर्वी आपले सारे दाग-दागिने एकत्र करून त्यांनी ते गाठोडे शेजारणीकडे ठेवले. पण त्या जसजशा पंढरीच्या दिशेने पुढे सरकत होत्या तसतसे त्यांचे मन त्या गाठोड्याच्या दिशेने मागे मागे जात होते. आपले दागिने चोरीला गेले तर आपले पुढे काय होईल या भीतीने त्या इतक्या ग्रस्त होत्या की पांडुरंगाच्या जागी त्याना ते दागिन्यांचे गाठोडेच दिसायला लागले.
असेच एक सद्गृहस्थ आजारी वडिलांना भेटण्यासाठी ट्रेनमध्ये बसून निघाले होते. ते इतके टेन्शनमध्ये होते की बसताना ते आपली बॅग डोक्यावर घेऊन बसले. शेजारी म्हणाला, बॅग वर किंवा पायाखालच्या जागेत ठेऊ शकता. त्यावर ते सद्गृहस्थ काय म्हणतात? माझे तिकीट काढले आहे; बॅगेचे नाही! बॅग डोक्यावर ठेवल्याने त्यांचे टेन्शन कमी कसे होणार होते हे त्या पांडुरंगालाच ठावे.
विचलित न होता हाती घेतलेल्या कामात पूर्णपणे बुडून जाणारा किंवा चालू क्षणांना आनंदाने सामोरे जाणारा माणूस आपोआप यशाच्या मुक्कामी पोहोचतो. विद्यार्थी असो, खेळाडू असो, चित्रकार असो, गायक असो, शिक्षक असो वा आणखी कोणी असो, कामात पूर्ण लक्ष घातले की तो यशस्वी होणार हे नक्की. बर्फ जसा पाण्यात विरघळतो किंवा तेल आणि वात जसे पूर्णपणे एकरूप होऊन प्रकाश देण्याचे काम करतात, तसे माणसाने कामाशी एकरूप झाले पाहिजे.
आजीबाईनी गाठोड्याचा विचार डोक्यातून काढून टाकणे किंवा त्या गृहस्थाने डोक्यावरचे ओझे खाली उतरून ठेवणे आवश्यक होते. आजीबार्इंनी विठ्ठलाचे नामस्मरण करत राहणे आणि त्या गृहस्थाने वडिलांना आराम पडावा म्हणून औषधोपचारांचे नियोजन करत, सद्भावनांचे वलय विस्तारत ठेवणे अधिक महत्वाचे होते.
-प्रल्हाद जाधव

Download Our App

Download Our App
Neskurul App

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"